टी-20 विश्वचषक 2022 पूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियान क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू मार्क स्टॉयनिस मागच्या काही काळापासून दुखापतग्रस्त आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या आगामी टी-20 मालिकेत तो सहभाग घेईल अशी संघाला अपेक्षा होती, पण या मालिकेतून त्याने माघार घेतली आहे. आगामी टी-20 विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला असल्यामुळे विश्वचषकात तो खेळण्याची देखील खूपच कमी शक्यता उरली आहे.
इएसपीएन क्रिकइंफोने याविषयी माहिती दिली आहे. वृत्तानुसार मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) या मागच्या महिन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. न्यूजीलंडविरुद्ध 8 सप्टेंबर रोजी केर्न्समध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला भारत दौऱ्यातून देखील माघार घ्यावी लागली. ऑस्ट्रेलियान संघाने भारताविरुद्ध खेळलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत स्टॉयनिस संघात नव्हता आणि त्याच्या जागी टिम डेविड याला संधी दिली गेली.
टिम डेविडने देखील मिळालेल्या या संधीचे सोने करून दाखवले. त्याने भारतीय खेळपट्टीवर वादळी खेळी केली. मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टिम डेविड आणि मॅथ्यू वेड यांनी संघासाठी महत्वाची भागीदारी पार पाडली आणि यजमान भारताला पराभवाची धूळ देखील चारली. त्यानंतर हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात देखील त्याने 27 चेंडूत 54 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
स्टॉयनिस मागच्या तीन वर्षांपासून ऑस्ट्रेलियन संघाच्या मध्यक्रमातील प्रमुख खेळाडू आहे. त्याने मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात संघासाठी दोन सामन्यांमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले, जे संघासाठी महत्वपूर्ण ठरले होते. त्याच्या आजवरच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत एकूण 44 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान 33 सामन्यांमध्ये त्याने फलंदाजी केली आणि 140.69 च्या स्ट्राईक रेटने 612 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजाच्या भूमिकेत त्याने या सामन्यांमद्ये एकूण 13 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, शिमरन हेटमायरला दाखवला विश्वचषका संघातून बाहेरचा रस्ता
मराठीत माहिती- क्रिकेटर रिषभ पंत






