ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार मार्क टेलर यांनी विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत. टी -२० आणि वनडेच्या या युगात, भारतातील कसोटी क्रिकेट अजूनही बहरत आहे. भारतात कसोटी क्रिकेट पाहणाऱ्या चाहत्यांची किंवा प्रायोजकांची कमतरता नाही. मार्क टेलर यांनी याचे श्रेय भारतीय कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिले आहे.
भारताने गेल्या तीन वर्षांत ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी दोनदा कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. अलीकडेच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडीही घेतली होती.
मार्क टेलर यांना भीती वाटते की, येत्या काही वर्षांमध्ये कसोटी क्रिकेट धोक्यात येऊ शकते, कारण अनेक देशांत खेळाच्या या दीर्घ स्वरूपासाठी सामना पाहणाऱ्यांची कमतरता दिसत आहे.
मार्क टेलर म्हणाले, ‘विराट कोहली आणि रवी शास्त्री हे अलीकडच्या काळात कसोटी क्रिकेटचे उत्तम समर्थक आणि प्रचारक आहेत. मला वाटते की कोहली या बाबतीत उत्कृष्ट आहे आणि खेळाला प्राधान्य देत आहे. कसोटी क्रिकेट खेळण्याची त्याची खरोखर इच्छा आहे.’
ते म्हणाले, ‘खरी चिंता ही आहे की, ही काळजी किती काळ सुरू राहणार आहे. यात काही शंका नाही की जसजसे आपण मोठे होत जातो आणि नवीन पिढी येते, माझ्यासारखे लोकांचे कसोटी क्रिकेटवरील प्रेम कमी होऊ शकते आणि ही आमच्या जुन्या पिढीसाठी चिंतेची बाब आहे.’
५६ वर्षीय माजी खेळाडूने आशा व्यक्त केली की, इंग्लंड आणि भारत यांच्यातील मँचेस्टर येथे होणारी पाचवी आणि शेवटची कसोटी रद्द करण्याचा निर्णय इंडियन प्रीमियर लीगला प्राधान्य देण्यासाठी घेतला गेलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्ली कॅपिटल्सला धक्का! ‘हा’ फिरकीपटू आयपीएल २०२१ मधून पडला बाहेर, सरावादरम्यान झाली दुखापत
बटलरच्या जागी आयपीएलमध्ये खेळणारा खेळाडू आहे जबरदस्त फॉर्ममध्ये, राजस्थानसाठी ठरु शकतो ‘एक्स फॅक्टर’
Video: डिव्हिलियर्सची ‘३६० डिग्री’ फटकेबाजी; ४६ चेंडूत शतक करत वाढवलं प्रतिस्पर्ध्यांचं टेंशन