---Advertisement---

जो रुट तोडणार सचिनचा ‘हा’ विक्रम, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी

On: सोमवार, जून 6, 2022 5:02 PM
Joe-Root-Sachin-Tendulkar
---Advertisement---

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट याने सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडवर ५ गडी राखत विजय मिळवला. रुटने हे सतक झळकावल्यानंतर अनेक विक्रम आपल्या नावे केल्या आहेत. त्यातील एक विक्रम म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी कालावधीत १०हजार धावांचा टप्पा पूर्ण करणे. रुटच्या या विक्रमानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मार्क टेलर याने मोठे विधान केले आहे. 

मार्क टेलरच्या मते जो रूट सचिन तेंडुलकरचा कसोटीत सर्वाधिक धावांचा विक्रम मोडू शकतो. रूट सध्या त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असून त्याच्या कारकिर्दीला अजून कमीत कमी ५ ते ६ वर्षे बाकी आहेत. सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामन्यांमध्ये १५,९२१ धावा केल्या आहेत. रूट व्यतिरिक्त, कोणत्याही सक्रिय आंतरराष्ट्रीय खेळाडूने १० हजार कसोटी धावा केल्या नाहीत. त्यामुळे सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सचिनचा विक्रम केवळ रुटच मोडू शकेल अशी शक्यता आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या पहिल्या कसोटी सामन्या न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी २७७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जो रुटने १७० चेंडूत नाबाद ११५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार मारले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने ७८.५ षटकात ५ बाद २७९ धावा केल्या आणि सामना आपल्या नावे केला.

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर जो रूट कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून ४-० असा पराभव पत्करावा लागल्याने इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. त्याने सर्वाधिक ६४ सामन्यांमध्ये २७ विजयांसह इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार म्हणून कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व बेन स्टोक्सच्या हाती गेले आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

कडकडून मिठी अन् कौतुक! लॉर्ड्सवर शतक करणाऱ्या रुटचे कर्णधार स्टोक्सकडून ‘ग्रँड वेलकम’

कोहली, राहुल अन् रोहितने खेळावर लक्ष द्यावे; कपिल पाजींनी तिघांना फटकारले

धोनी, सेहवाग, रैना सर्वच झाले निवृत्त, पण ‘त्या’ सामन्यात खेळलेला कार्तिक आजही टीम इंडियात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---