अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील २१ वा सामना पार पडला. या सामन्यात स्कॉटलॅंड आणि नामीबिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. पात्रता फेरीतील सामने जिंकून आलेल्या नामिबिया संघाने सुपर -१२ फेरीतील पहिल्याच सामन्यात ४ गडी राखून जोरदार विजय मिळवला. या विजयानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान या सामन्यात स्कॉटलॅंड संघाच्या गोलंदाजाने अप्रतिम चेंडू टाकून फलंदाजाला बाद केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
या सामन्यात नामिबिया संघाने प्रथम फलंदाजी करताना १०९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करत असताना, नामिबिया संघाने ४ गडी शिल्लक ठेवत हा सामना आपल्या नावावर केला होता. या सामन्यात स्कॉटलॅंड संघातील गोलंदाज मार्क वॅटने एक अप्रतिम चेंडू टाकला होता, जो फलंदाजाला कळलाच नाही आणि फलंदाज बाद होऊन माघारी परतला.
आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या भरपूर व्हायरल होत आहे. तर झाले असे की, नामिबिया संघाची फलंदाजी सुरू असताना १३ वे षटक टाकण्यासाठी मार्क वॅट गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्कॉटलॅंडचा फलंदाज क्रेग विलियम्सने स्टेप आऊट होऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु गोलंदाजाने या गोष्टीचा पूर्वानुमान लावत चेंडू फलंदाजापासून थोडा दूर टाकला, ज्यामुळे फलंदाज हा शॉट खेळू शकला नाही. त्यानंतर यष्टिरक्षकाने त्याला यष्टीचीत केले.
https://www.instagram.com/reel/CVih0vOl0bJ/?utm_medium=copy_link
नामबिया संघाचा जोरदार विजय
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नामबिया संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर स्कॉटलॅंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, मायकल लिस्कने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली होती. तर ख्रिस ग्रिव्सने २५ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर स्कॉटलॅंड संघाला २० षटक अखेर ८ बाद १०९ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना नामबिया संघाकडून जेजे स्मितने नाबाद ३२ धावांची खेळी केली. तर क्रेग विलियम्सने २३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर नामबिया संघाने ५ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्याशी बोलणं म्हणजे स्वतःवर चिखल उडवून घेण्यासारखे’; भज्जी आमीरवर पुन्हा बरसला
ऑस्ट्रेलिया-श्रीलंका संघांमध्ये कोणाची कामगिरी सरस? कशी असेल उभयंताची प्लेइंग इलेव्हन? वाचा सर्वकाही
नामबिया संघाची गुणतालिकेत मोठी उडी, भारत अन् न्यूझीलंडला पछाडत टॉप-३ मध्ये धडक