इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिकेला प्रारंभ झाला आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिले दोन दिवस ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत इंग्लंड संघातील खेळाडूंना पूर्णपणे बॅकफूटवर टाकले आहे. ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेविस हेडने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, इंग्लंडच्या गोलंदाजाने ट्रेविस हेडला असा काही जीवघेणा चेंडू टाकला की, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (९ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. या संघाकडून डेविड वॉर्नरने ९४ धावांची खेळी केली, तर मार्नस लॅब्यूशेनने ७४ धावांचे योगदान दिले. त्यानंतर ट्रेविस हेड फलंदाजीला आला आणि त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. त्याने टी२० स्टाईलमध्ये फलंदाजी करत ८४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. तर १५२ धावांची खेळी करत तो माघारी परतला.
मार्क वूडच्या चेंडूवर थोडक्यात बचावला हेड
ट्रेविस हेडने शतक पूर्ण केल्यानंतर इंग्लंडने नवीन चेंडू घेतला होता. नवीन चेंडूने दुसरे षटक टाकण्यासाठी मार्क वूड गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर ट्रेविस हेड गंभीर जखमी होता होता थोडक्यात बचावला. तर झाले असे की, चेंडू नवीन असल्यामुळे तो मार्क वूडच्या हातातून निसटला आणि सरळ ट्रेविस हेडच्या छातीच्या दिशेने गेला.
त्यावेळी त्याने बॅट स्विंग केली ज्यामुळे चेंडू गलोजला लागला आणि चेंडूची गती कमी झाली. त्यानंतर तो चेंडू त्याच्या जबड्याला लागला आणि तो त्याच क्षणी खेळपट्टीवर पडला. जर त्याने आपला ग्लोज मध्ये आणला नसता तर तो चेंडू थेट ट्रेविस हेडच्या छातीला जाऊन लागला असता. जर असे झाले असते तर फलंदाज गंभीर जखमी झाला असता. त्यानंतर लगेच फिजियोने मैदानाच्या दिशेने धाव घेतली.
A quick Beamer from Mark Wood hit Travis Head on his body and he is down.#Ashes #Ashes2021 #TravisHead pic.twitter.com/62eBp6LFrh
— Sravan (@Sravan_457) December 9, 2021
या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांवर संपुष्टात आला. तसेच ऑस्ट्रेलियाने हेड, लॅब्यूशेन आणि वॉर्नर यांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ४२५ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला २७८ धावांची मोठी आघाडी मिळाली.
महत्वाच्या बातम्या :
काळजात धस्स करवणारी बातमी! श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हत्तीचा हल्ला, दोघांचा मृत्यू