---Advertisement---

वेगाचा नवा बादशाह! वूडने केलीये टी20 इतिहासातील सर्वात भन्नाट गोलंदाजी

On: शनिवार, ऑक्टोबर 22, 2022 7:15 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीला शनिवारी (22 ऑक्टोबर) सुरुवात झाली. दिवसातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड आणि अफगाणिस्तान आमनेसामने आले. इंग्लंडने या सामन्यात घातक गोलंदाजी करत अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर गुंडाळला. यादरम्यान इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज मार्क वूड याने अतिशय वेगात गोलंदाजी करत नवा विक्रम प्रस्थापित केला.

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सर्व गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अष्टपैलू सॅम करनने केवळ 10 धावा देत अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत धाडला. मार्क वूड व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी दोन तर ख्रिस वोक्सने एक गडी बाद केला. परिणामी, अफगाणिस्तान संघ 112 धावांवर सर्वबाद झाला.

या सामन्यात इंग्लंडसाठी गोलंदाजी करणाऱ्या मार्क वूड याने अक्षरशः वेगाशी स्पर्धा केली. त्याने सातत्याने 145 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत अफगाणिस्तान संघाला हैराण केले. त्याने या आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये प्रत्येक चेंडू 140 किमी प्रतितास पेक्षा वेगाने टाकला. यादरम्यान तो काही वेळा 150 चा आकडा देखील पार करत होता. या स्पेलमध्ये त्याने 154.4 किमी प्रतितास हा सर्वात वेगवान चेंडू टाकला.

वूडने टाकलेल्या या स्पेलमधील चेंडूंचा सरासरी वेग 149 किमी प्रतितास इतका राहिला. हा टी20 विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाजी स्पेल आहे. यापूर्वी 2009 मध्ये इंग्लंड येथे झालेल्या टी20 विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या फिडेल एडवर्डसने भारताविरुद्ध 146 किमी प्रतितास या सरासरी वेगाने गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या डर्क नॅनेस यानेही याच सरासरी वेगाने 2010 टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध गोलंदाजी केली होती. वूडने मागील विश्वचषकातही न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात 145 किमी प्रतितास असा सरासरी वेग दाखवला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महामुकाबल्यातून पाकिस्तानचा हुकमी एक्का बाहेर! टीम इंडियाला दिलेली मोठी जखम
देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय इशान किशन, ओडिसाविरुद्ध केलेले शतक ठरले ऐतिहासिक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---