---Advertisement---

पराभवाच्या जखमेवर दुखापतीचं मीठ, लॉर्ड्स कसोटीत ५ विकेट्स घेणारा इंग्लंडचा ‘हा’ गोलंदाज संघाबाहेर?

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 10:08 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसू शकतो. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड तिसऱ्या कसोटी सामन्यातून वगळला जाऊ शकतो. कारण लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचे तिसऱ्या सामन्यात खेळणे थोडे कठीण आहे. दुखापतीच्या समस्येमुळे इंग्लंड आधीच काही प्रमुख खेळाडूंशिवाय खेळत आहे. अशात वुडची अनुपस्थिती त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरेल.

स्टुअर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स दुखापतींमुळे आधीच मालिकेतून बाहेर पडले आहेत. बेन स्टोक्सने मानसिक आरोग्याच्या कारणांमुळे अनिश्चित काळासाठी रजा घेतली आहे. आता वुड देखील या यादीत सामील होऊ शकतो.

लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी रिषभ पंत 74 व्या षटकात फलंदाजी करत होता. त्यानंतर मोईन अलीच्या चेंडूवर पंतने बॅटची कड घेत चेंडू सीमेच्या दिशेने टोलवला. वुडने पंतचा चौकार अडवण्यासाठी घाईघाईने डाईव्ह मारली आणि त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर फिजिओंनी त्याला मैदानाबाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. म्हणून तो सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये खांद्यावर पट्टी बांधून फिरतांना दिसला होता.

वुडच्या दुखापतीविषयी मंगळवारी (17 ऑगस्ट) इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनी सांगितले की, “डॉक्टर त्याच्या (मार्क वुड) दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. पुढील दोन दिवसात त्याची परिस्थिती अजुन स्पष्ट होईल. त्याच्याशी आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ.”

लॉर्ड्स कसोटीत जखमी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या जागी वुडचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात वुडने इंग्लंडसाठी शानदार गोलंदाजी केली आहे. त्याने या सामन्यात 42.1 षटके टाकली. यात त्याने 6 षटके निर्धाव टाकली आणि 5 बळी घेतले. दरम्यान त्याने 142 धावा खर्च केल्या.

तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे सुरू होईल. तत्पूर्वी नॉटिंगहॅममध्ये खेळलेली पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली होती. त्यानंतर लॉर्ड्समध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 151 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहेत. ते सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

लॉर्ड्स कसोटीतील दारुण पराभवानंतर जो रूट सोडेल नेतृत्त्वपद, माजी कर्णधाराने व्यक्त केली चिंता

‘काय विजय आहे! काय संघ आहे!’; विराटसेनाच्या थरारक विजयाचे अनुष्काकडून तोंडभरुन कौतुक

‘तुम्ही मुर्खपणा करत असाल, तर तुमची सामना जिंकण्याचीही लायकी नाही,’ दिग्गजाची इंग्लंडवर जहरी टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---