गुवाहाटी। भारत विरुद्ध विंडीज यांच्या आज (21 आॅक्टोबर) पहिला वनडे सामना सुरु आहे. हा सामना विंडीजचा अनुभवी फलंदाज मार्लोन सॅम्यूएल्यचा 200 वा वनडे सामना आहे. मात्र या सामन्यात त्याच्या नावावर नकोसा असा विक्रम झाला आहे.
या सामन्यात सॅमुअल्स 15 व्या षटकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. पण त्याला 16 व्या षटकात भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने शून्य धावेवर असतानाच पायचीत केले.
त्यामुळे तो 200 व्या वनडेत शून्य धावेवर बाद होणारा एकूण आठवा तर विंडीजचा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी विंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा हे त्यांच्या 200 व्या सामन्यात शून्य धावेवर बाद झाले होते.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम करण्याचा निर्णय घेतला होता. पण विंडीजकडून पदार्पण करणारा सलामीवीर फलंदाज चंद्रपॉल हेमराज 9 धावांंवर बाद झाला. पण त्यानंतर कायरन पॉवेल आणि शिमरॉन हेटमेयरने विंडीजचा डाव सांभाळला.
पॉवेलने 51 आणि हेटमेयरने 106 धावांची खेळी केली आहे. या दोघांच्या खेळीच्या जोरावर विंडिजने 40 षटकांमध्ये 250 धावांचा टप्पा ओलांडला होता.
200 व्या वनडे सामन्यात शून्य धावेवर बाद होणारे क्रिकेटपटू:
रोशन महानामा- श्रीलंका
ब्रायन लारा- विंडीज
ख्रिस केर्न्स- न्यूझीलंड
अॅडम गिलख्रिस्ट – आॅस्ट्रेलिया
अब्दुल रझाक – पाकिस्तान
हरभजन सिंग – भारत
शोएब मलिक – पाकिस्तान
मर्लोन सॅम्यूएल्स – विंडिज
महत्त्वाच्या बातम्या:
–२०१९ च्या आयपीएलमध्ये बेंगलोरचा विकेटकिपर खेळणार मुंबईकडून
–एमएस धोनीला हा ‘कुल’ विक्रम करत सचिन, द्रविडच्या यादीत सामील होण्याची संधी
–रिषभ पंतचे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण; पहिल्या वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडीया
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..