ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेतील (Ashesh Series) दुसरा कसोटी सामना (2nd Test Match) सुरू आहे. या दिवस रात्र कसोटी सामन्यातील सुरुवातीचे दोन्ही दिवस ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजांच्या नावे राहिले. पहिल्या दिवशी (१६ डिसेंबर) डेविड वॉर्नर (David Warner) ९४ धावा करत बाद झाला. तर दुसऱ्या दिवशी मार्नस लॅब्युशेनने (Marnus Labuschagne) तुफानी शतक झळकावले. यासह त्याने सर डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्यासारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
मार्नसने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने शानदार फलंदाजी करत १०३ धावांची खेळी केली. त्यानंतर तो ओली रॉबिन्सनच्या चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. परंतु त्याच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने कसोटी कारकिर्दीत २००० धावा पूर्ण केल्या आहेत.
मार्नसने आपल्या कारकिर्दीतील २० व्या कसोटी सामन्यातील ३४ व्या डावात २००० धावांचा पल्ला गाठला आहे. तसेच सर्वात जलद २००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ५ व्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत त्याच्या पुढे सर डॉन ब्रॅडमन आहेत. त्यांनी १५ सामन्यातील २२ डावात हा कारनामा केला होता. तर वेस्ट इंडीजच्या जॉर्ज हेडली यांनीने १७ सामन्यातील ३२ डावात हा कारनामा केला होता. इंग्लंडच्या हर्बर्ट सटफ्लिक यांनी २२ सामन्यातील ३३ डावात ही कामगिरी केली होती. तसेच ऑस्ट्रेलियाच्या मायकल हसीने २० सामन्यातील ३३ डावात हा कारनामा केला होता.
या खेळीसह त्याच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो २० सामने झाल्यानंतर सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत सर डॉन ब्रॅडमनला देखील मागे टाकले आहे. मार्नसने २० व्या सामन्यात १७ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. यादरम्यान डॉन ब्रॅडमन यांनी १३ शतके झळकावली होती. तर २ दुहेरी शतक देखील झळकावली होती. या यादीत ब्रायन लारा तिसऱ्या स्थानी आहे. तर विवियन रिचर्ड्स चौथ्या स्थानी आहेत. या दोन्ही दिग्गज फलंदाजांनी २० सामने उलटून गेल्यानंतर १३ वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या-
Video: ‘टीम इंडिया’ पोहोचली दक्षिण आफ्रिकेत; श्रेयसने धरला ताल तर विराट…
डी कॉक होणार बाबा! कसोटी मालिकेपूर्वी पत्नीसह घेतोय सुट्ट्यांचा आनंद
बेंगलोरची पराभवाची मालिका खंडित; एटीकेविरूद्ध मानावी लागली ३-३ अशी बरोबरी






