आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक असे दिग्गज फलंदाज होऊन गेले आहेत, जे आपल्या विशिष्ठ शॉटसाठी प्रसिद्ध आहेत. एमएस धोनी (Ms dhoni) आपल्या हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध आहे, तर रिकी पाँटिंग (Ricky ponting) आपल्या पुल शॉटसाठी ओळखला जातो. तसेच भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) हा आपल्या स्ट्रेट ड्राईव्हसाठी प्रसिद्ध आहे आणि विराट कोहली (Virat Kohli) आपल्या कव्हर ड्राईव्हसाठी जगप्रसिद्ध आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज मार्नस लॅब्यूशेन (Marnus labhuchagne) याने विराट कोहलीच्या कव्हर ड्राईव्ह आणि सचिन तेंडुलकरच्या स्ट्रेट ड्राईव्हबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया सोबत बोलताना मार्नस लॅब्यूशेनने आपला आवडता शॉट कुठला याबाबत खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, “उजव्या हाताच्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर मी सचिन तेंडुलकरच्या स्ट्रेट ड्राईव्हने सुरुवात करेल. हा एक असा शॉट आहे जो मला पाहायला खूप आवडतं. या शॉटमध्ये सचिनचा क्लास दिसायचा. त्यानंतर मला रिकी पाँटिंगचा पुल शॉट खूप आवडतो. प्रत्येकाला त्याचा हा शॉट खूप आवडायचा.”
विराट कोहलीच्या कव्हर ड्राईव्हचे गायले गुणगान
पुढे बोलताना मार्नस लॅब्यूशेनने भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव घेतले. ज्याची कव्हर ड्राईव्ह प्रसिद्ध आहे. यासह त्याला केविन पीटरसनची आक्रमक फलंदाजी आवडते. तसेच स्टीव्ह स्मिथची धावा करण्याची भूक देखील खूप आवडते.
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह शॉट खूप आवडतो. ज्याप्रकारे तो हा शॉट खेळतो. त्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की, तो किती एनर्जीने तो शॉट खेळतोय. तसेच मला केविन पीटरसनचा लेग साईडचा शॉट खूप आवडायचा आणि ज्या आक्रमकतेने तो फलंदाजी करायचा ते देखील अप्रतिम होते. तो देखील विराट कोहली सारखा खेळपट्टीवर आक्रमक असायचा. त्यानंतर स्टीव्ह स्मिथला धावा करण्याची जी भूक आहे, ती देखील मला आकर्षित करते.”
महत्वाच्या बातम्या :
पहिल्या वनडेला एक्कावन्न वर्षे पूर्ण! वाचा ‘त्या’ ऐतिहासिक सामन्याबाबत काही रंजक गोष्टी
हे नक्की पाहा :