भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चांगराच रंगात आला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलिया 173 धावांनी आघाडीवर आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा फलंदाजीला आला. यावेळी ऑस्ट्रेलियाने डेविड वॉर्नर याच्या रूपात पहिली विकेट मगावली. या विकेटनंतर मैदानात एक मेजशीर प्रसंग पाहायला मिळाला.
डेविड वॉर्नर (David Warner) डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात 43 धावा करून बाद झाला होता. शुक्रवारी (9 जून) ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला. दुसऱ्या डावातील चौथ्या षटकात वॉर्नरने विकेट गमावली. त्याने या डावात 8 चेंडूत अवघी एक धाव करून मोहम्मद सिराजच्या चेंडूवर विकेट गमावली. वॉर्नर बाद झाल्यानंतर मार्नस लाबुशेन (Marnus labhuchagne) तत्काळ खेळपट्टीवर येणे अपेक्षित होते. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा लाबुशेन त्यावेळी डगआऊटमध्ये निवांत झोपला होता. लाबुशेनचा हा व्हिडिओत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Mohammed Siraj gatecrashes Marnus Labuschagne’s sleep ????????
????: Disney + Hotstar pic.twitter.com/f2InAuplFW
— ????????????????_????????????????????????????????????????????_7 (@lpurushothamre1) June 9, 2023
दरम्यान, उभय संघांतील हा सामन्याचा अंकदरीत विचार केला, तर भारताला विजयासाठी दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 121.3 षटकांमध्ये 469 धावांचा डोंगर उभा केला, जो भारतीय फलंदाज सर करू शकले नाहीत. अशात सामना जिंकायचा असेल, तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजाना झटपट बाद करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आधिच आघाडीवर असल्यामुळे विजय भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियासाठी जवळचा वाटत आहे.
तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी ट्रेविस हेड (163) आणि स्टीव स्मिथ (121) सर्वात्तम खेळी करू शकले होते. तर दुसरीकडे भारतासाठी अजिंक्य रहाणे (89), रविंद्र जडेजा (48) आणि शार्दुल ठाकुर (51) यांनी दबावाच्या परिस्थितीत महत्वाच्या धावा केल्या. (Marnus labhuchagne was left to sleep as David Warner was dismissed with 1 ruck)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा रहाणे चौथाच फलंदाज, पहिली तिन्ही नावे भारतीयांची मान उंचावणारी
अजिंक्य रहाणेची दर्जा खेळी! अवघ्या ‘इतक्या’ धावांनी हुकले शतक, मोठा विक्रम होता होता राहिला