गुरुवारी (7 सप्टेंबर) दक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्स राखून हा सामना जिंकला. कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून फलंदाजीला आलेल्या मार्नस लॅब्युशेन याने शानदार नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर बोलताना त्याने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईच्या विश्वासाला दिले.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने घेतलेला प्रथम गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करतना यजमान संघ 222 धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार टेंबा बवुमा याचे नाबाद शतक (114) दक्षिण आफ्रिकेसाठी निर्णायक ठरले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 40.2 षटकांमध्ये 223 धावांचे लक्ष्य गाठले आणि मालिकेत 0-1 अशी आघाडीही घेतली. संघ अडचणीत असताना कॅमेरून ग्रीन याच्या जागी कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून आलेल्या मार्नस लॅब्युशेन याने 93 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली. त्याने एगरसोबत आठव्या गड्यांसाठी नाबाद शतकी भागीदारी करून संघाचा विजय साकार केला.
Always listen to your mum 😂 https://t.co/PRKSQHCUvL pic.twitter.com/WkuJpOxIJR
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) September 8, 2023
लॅब्युशेन याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. याची कल्पनाच त्याने सामना सुरू होण्याआधी आपल्या आईला दिली होती. त्यावेळी त्याच्या आईने त्याला विश्वास दिला की तू आजचा सामना खेळणार आहे. केवळ दुसराच चेंडू खेळत असताना ग्रीन याच्या डोक्यावर चेंडू लागल्याने तो मैदाना बाहेर गेला. त्याच्या जागी येऊन लॅब्युशेनने संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर आता लॅब्युशेनने एक ट्विट करत ‘नेहमी आईचे ऐकत जा’ असे कॅप्शन दिले.
लॅब्युशेन यापूर्वी देखील असाच कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात सामील झाला होता. 2019 ऍशेसमध्ये स्टीव्ह स्मिथ याच्या जागी खेळायला आल्यानंतर त्याने दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याने आपल्या खेळात सातत्य दाखवत कसोटी फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानापर्यंत मजल मारली आहे.
(Marnus Labuchagne Tweet On His Mom Faith About Match Against South Africa)
हेही वाचाच-
‘नजम सेठी कुठला माल फुकत…’, भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या माजी पीसीबी अध्यक्षावर कडाडला ‘भज्जी’
भारत-पाकिस्तान सामन्याबाबत ब्रेकिंग! आशियाई क्रिकेट परिषदेने घेतला मोठा निर्णय, लगेच वाचा