इंग्लंड विरुद्धच्या मार्नस लॅबुशेनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे. जी 53 वर्षांच्या इतिहासात कोणताही क्रिकेटपटू करू शकलेला नाही. ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात लॅबुशेनने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने केवळ बॅटच नव्हे तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही चमकदार कामगिरी केली.
इंग्लंडविरुद्ध त्याने 61 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी खेळली. गोलंदाजीत त्याने बेन डकेटच्या महत्त्वाच्या विकेटसह एकूण तीन बळी घेतले. याशिवाय क्षेत्ररक्षणातही त्याने तीन झेल घेतले. एकाच वनडे सामन्यात अर्धशतक, तीन विकेट्स आणि चार झेल घेणारा लॅबुशेन जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
बेन डकेटच्या 95 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने कांगारूंना विजयासाठी 316 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाहुण्या संघांनी ही धावसंख्या 44 षटकांत 7 विकेट्स शिल्लक असताना गाठली. धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने 154 धावांची नाबाद खेळी खेळली. हेडने आपल्या खेळीत 20 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार मारले. तर मार्नस लॅबुशेनने 77 धावांची खेळी खेळली.
🚨RECORD ALERT 🚨
Marnus Labuschagne becomes the first ever player in history to score 50+ runs and picks 4+ catches and 3+ wickets in the same ODI match 💥#MarnusLabuschagne #ENGvAUS #ODIs #Sportskeeda pic.twitter.com/V0zSkJzBfw
— Sportskeeda (@Sportskeeda) September 20, 2024
या विजयासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा सलग 13 वा विजय ठरला आहे. यासह त्याने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या 12-12 विजयांचा विक्रम मोडीत काढला आहे. तर एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक सलग विजय मिळवण्याच्या यादीत देखील ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक सलग विजय
21 – ऑस्ट्रेलिया (जानेवारी 2003 – मे 2003)
13 – श्रीलंका (जून 2023- सप्टेंबर 2023)
13* – ऑस्ट्रेलिया (ऑक्टोबर 2023 – चालू आहे)*
12 – दक्षिण आफ्रिका (फेब्रुवारी 2005 – ऑक्टोबर 2005)
12 – पाकिस्तान (नोव्हेंबर 2007 – जून 2008)
12 – दक्षिण आफ्रिका (सप्टेंबर 2016 – फेब्रुवारी 2017)
हेही वाचा-
हसन महमूदची भारताविरुद्धही शानदार कामगिरी, असं करणारा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या प्रशिक्षकाची आयपीएलमध्ये एंट्री, या संघानं सोपवली मोठी जबाबदारी
बाबर आझमचा इतका मोठा अपमान! पाकिस्तानी खेळाडूनं भर सामन्यात घेतली मजा