---Advertisement---

नक्की असं घडलं काय की मार्नस लॅब्युशेनने घेतलेल्या त्या झेलावर झाला मोठा वाद, घ्या जाणून 

On: रविवार, एप्रिल 4, 2021 8:43 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये अनेक सामन्यांमध्ये विविध गोष्टी घडत असतात. त्यांची चर्चाही होत असते. बऱ्याचदा अशाही काही गोष्ट घडत असतात, ज्यामुळे अनेकदा वाद निर्माण होतो. अशीच घडना ऑस्ट्रेलियामध्ये एका सामन्यात मार्नस लॅब्युशेनने घेतलेल्या झेलामुळे झाला आहे.

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये शेफिल्ड शील्ड स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत ३ एप्रिलपासून न्यू साऊथ वेल्स आणि क्विन्सलँड संघात सामना सुरु झाला आहे. या सामन्यात मार्नस लॅब्युशेनने एक विवादात्मक झेल घेतला आहे. ज्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.

झाले असे की नॉर्थ डाल्टन पार्क येथे सुरु असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ एप्रिलला क्विन्सलँड संघ क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी १२५ व्या षटकात न्यू साऊथ वेल्सकडून यष्टीरक्षक फलंदाज बॅक्टर होल्ट फलंदाजी करत होता. त्यावेळी मिशेल स्वीप्सनच्या गोलंदाजीवर एक फटका खेळला. पण तो चेंडू मार्नस लॅब्युशेनच्या हातात आला.

मात्र, हा झेल घेतल्यानंतर त्याचे संतुलन बिघडले आणि तो उलटा धावू लागला. याचवेळी त्याच्या हातून चेंडू निसटला आणि तो चेंडू खाली मैदानावर पडला. यानंतर समालोचकांसह अनेकांना वाटले की होल्टला जीवदान मिळाले. मात्र, पंचांनी त्याला बाद दिले. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत.

नियमानुसार जर क्षेत्ररक्षकाची झेल घेण्याची प्रक्रिया तेव्हाच संपते जेव्हा तो त्याच्या शरीरावर आणि चेंडूवर पूर्ण नियंत्रण ठेवतो. मात्र, लॅब्युशेनचा झेल पाहाता पंचांनी दिलेला निर्णय चूकीचा असल्याने अनेकांनी म्हटले आहे, कारण ज्यावेळी लॅब्युशेनकडून झेल सुटला होता, त्यावेळी तो पुर्णपणे नियंत्रित नव्हता.

https://twitter.com/stephen_kelly19/status/1378653962488881153

या सामन्यात होल्टला विवादात्मकरित्या बाद दिल्याने न्यू साऊथ वेल्सचा पहिला डाव ३८१ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर क्विन्सलँड संघ फलंदाजीला उतरला. दुसरा दिवस संपला तेव्हा क्विन्सलँडने ६३ षटकांत २ बाद १८४ धावा केल्या आहेत. लॅब्युशेन ८१ धावांवर आणि उस्मान ख्वाजा १२ धावांवर खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

…जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू करतात चार्ली चॅप्लिनची नक्कल, पाहा धमाल व्हिडिओ

“मुंबई इंडियन्स विरूद्ध सलामीच्या सामन्यात ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह उतरेल आरसीबीचा संघ”

मोईन अलीच्या मागणीला आले यश! चेन्नईने त्याच्यासाठी खास जर्सीत केला ‘हा’ बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---