ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघांमध्ये सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिलाय. कराचीमध्ये १२ मार्चपासून दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅब्यूशेन धावबाद झाला. तो शून्य धावेवर बाद झाला. लॅब्यूशेनने ९ चेंडूंचा सामना केला आणि नौमन अलीच्या चेंडूवर धावा काढन्याच्या नादात साजिद अलीने त्याला बाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील २१ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर लॅब्यूशेनने मिडऑफच्या दिशेने एक शॉट खेळला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या साजिदने चेंडू पकडत तो वेगाने फेकला आणि तो यष्टीवर जाऊन आदळला. रीप्लेमध्ये असे दिसून आले की, लॅब्यूशेनची बॅट क्रीजपासून काही इंच दूर होती.
𝐍𝐨 𝐑𝐮𝐧 for Marnus today. #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/Hww22n089e
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 12, 2022
ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज ० धावसंख्येवर धावबाद झाला. असे तब्बल २७ वर्षांनंतर घडले आहे. याआधी १९९५ मध्ये माजी फलंदाज जो एंजेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ० धावेवर धावबाद झाला होता.
दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी मिळून संघाला चांगली सुरूवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी झाली. संघाच्या ९१ धावसंख्येवर लॅब्यूशेन बाद झाला.
ऑस्ट्रेलिया संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. यापूर्वी १९९८ साली ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान दौरा केला आहे. तिसरा कसोटी सामना २१ ते २५ मार्चदरम्यान लाहोर येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर या दोन संघामध्ये तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना २९ मार्च, दुसरा ३१ मार्च, तर तिसरा सामना २ एप्रिलला खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने रावळपिंडी येथे खेळले जाणार आहेत. तसेच ५ एप्रिलला रावळपिंडी येथे टी२० मालिका खेळली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’ खेळाडूसाठी द्रविड-रोहितवर संतापले चाहते; आल्या अशा प्रतिक्रिया
आयपीएल २०२२ पूर्वी ‘वंडर बॉय’ सर्फराजने बोलून दाखवली मोठी गोष्ट; म्हणाला…