---Advertisement---

स्मिथचा तो विक्रम मोडणे नक्कीच सोपं नव्हतं, पण लॅब्यूशानेने ते करुन दाखवलं!

On: शनिवार, जानेवारी 4, 2020 4:28 PM
---Advertisement---

कालपासून(3 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी येथे तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लॅब्यूशानेने द्विशतक झळकावले असून एक मोठा विक्रमही केला आहे.

लॅब्यूशानेने 363 चेंडूत 215 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 1 षटकार मारला. या खेळीबरोबरच आता त्याची कसोटी कारकिर्दीतील धावांची सरासरी 63.63अशी झाली आहे.

त्यामुळे त्याने कसोटीमध्ये सर्वाधिक सरासरी (कमीतकमी 20 डाव खेळल्यानंतर) असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. त्याने हा पराक्रम करताना त्याचाच संघसहकारी स्टिव्ह स्मिथला मागे टाकले आहे. स्मिथ या यादीत 62.84 च्या सरासरीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन आहेत.  त्यांची कसोटी क्रिकेटमध्ये 99.94 ची सरासरी आहे.

लॅब्यूशानेने आत्तापर्यंत कसोटीमध्ये 14 सामन्यात 22 डाव खेळताना 63.63 च्या सरासरीने 1400 धावा केल्या आहेत.

तो 22 कसोटी डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा 5 व्या क्रमांकाचा फलंदाजही ठरला आहे. या यादीत त्याच्यापुढे केवळ डॉन ब्रॅडमन, हर्बर्ट सटक्लिफ, इव्हर्टन विक्स आणि आर्थर मॉरिस हे क्रिकेटपटू आहेत.

विशेष म्हणजे लॅब्यूशानेचे हे पहिलेच द्विशतक आहे. त्याने मागील 5 कसोटी सामन्यात तीन शतके आणि एक द्विशतक केले आहे.

सिडनी येथे न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात लॅब्यूशानेच्या द्विशतकाच्या जोरावर सर्वबाद 454 धावा केल्या आहेत.

कसोटीमध्ये सर्वाधिक सरासरीने असणारे क्रिकेटपटू (कमीतकमी 20 डाव) – 

99.94 – डॉन ब्रॅडमन

63.63 – मार्नस लॅब्यूशाने

62.84 – स्टिव्ह स्मिथ

61.87 – ऍडम वोक्स

60.97 – ग्रॅमी पोलाक

22 कसोटी डावांनंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

2115 – डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)

1611 – हर्बर्ट सटक्लिफ (इंग्लंड)

1520 – इव्हर्टन विक्स (वेस्ट इंडिज)

1408 – आर्थर मॉरिस (ऑस्ट्रेलिया)

1400 – मार्नस लॅब्यूशाने (ऑस्ट्रेलिया)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---