ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना रावळपिंडी येथे पार पडला. हा सामना ५ दिवसांपर्यंत चालला, मात्र निकाल अनिर्णित राहिला. हा सामना अनेक गोष्टींसाठी चर्चेत राहिला. यात मग खेळपट्टीबद्दल वाद असो किंवा डेव्हिड वॉर्नरचे मैदानावरील डान्स करणे असो. दरम्यान, या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मार्नस लॅब्यूशेन याने त्याच्या ट्वीट्समुळे चाहत्यांची मने जिंकली आहेत.
या सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी होती. त्यामुळे अनेक प्रेक्षक सामन्यासाठी रावळपिंडीच्या स्टेडियममध्ये आले होते. यावेळी त्यांनी मार्नस लॅब्यूशेनच्या नावाचे काही पोस्टरही झळकावले होते. याबद्दल आता लॅब्यूशेनने ट्विटरवर विचारणा केली आहे.
त्याने ट्वीट केले की, ‘रावळपिंडीच्या प्रेक्षकांना पोस्टरसह पाहून मला आनंद झाला आणि मला शक्य तेवढ्या लोकांना तुम्ही केलेल्या स्वागतासाठी धन्यवाद म्हणायचे आहे. खाली तुम्ही आणलेल्या पोस्टरचे फोटो शेअर करा.’
त्याच्या या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. त्याला एका युजरने फोटो पाठवला आहे, ज्यातील पोस्टरवर लिहिले होते की, ‘मला एक कप कॉफी मिळेल का?’ त्यावर लॅब्यूशेनने लिहिले की, ‘एक दिवस मी सगळ्यांसाठी कॅफे उघडणार आहे.’ खरंतर अनेकदा लॅब्यूशेन कॉफी बनवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
तसेच दुसऱ्या एका युजरने फोटो पोस्ट केला आहे, ज्यातील पोस्टरवर लिहिले आहे की, ‘मार्नस आम्हाला तू खूप आवडतो. तुझ्या आडनावामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.’ यावर लॅब्युशेनने ‘थँक्स’ असे उत्तर दिले आहे. याशिवाय एका युजरने लॅब्यूशेन हे नाव कसे उच्चारतात हे एका पोस्टरवर लिहिलेला फोटो शेअर केला आहे.
रावळपिंडी कसोटीत १००० हून अधिक धावा निघाल्या, तर केवळ १४ विकेट्स गेल्या. त्यामुळे या सामन्यातील खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पण या सामन्यात लॅब्यूशेनही चांगल्या लयीत दिसला. त्याने फलंदाजी करताना ९० धावांची खेळी केली आणि १ विकेट घेतली.
😂 one day i'll open the cafe to everyone https://t.co/J88Nhdl2Tg
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) March 8, 2022
Thanks guys 👍🏼 https://t.co/XujXRFS355
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) March 8, 2022
Thanks for coming! https://t.co/AQ1KAMDQlm
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) March 8, 2022
Haha. For anyone wondering.. here's the answer 😂 https://t.co/xEZgg2FUZ0
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) March 8, 2022
This one was great pic.twitter.com/ckIACmNViO
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) March 8, 2022
पहिला कसोटी अनिर्णित
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात (Pakistan vs Australia) ४ ते ८ मार्च दरम्यान पहिला कसोटी सामना (1st Test) पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४७६ धावांचा डोंगर उभा केला होता. पाकिस्तानकडून इमाम-उल-हक (Imam-Ul-Haq) आणि अझर अली (Azhar Ali) यांनी पहिल्या डावात दीडशतकी खेळी केल्या. इमामने १५७ धावांची आणि अझर अलीने १८५ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशेन, नॅथन लायन आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तसेच त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने देखील दमदार फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद ४५९ धावा केल्या. पण त्यांना १७ धावांची पिछाडी स्विकारावी लागली. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने ९७, मार्नस लॅब्युशेन ९०, स्टीव्ह स्मिथ ७८ आणि डेव्हिड वॉर्नरने ६८ धावांच्या अर्धशतकी खेळी केल्या. तसेच कॅमेरॉन ग्रीनने ४८ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून नौमान अलीने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.
तसेच नंतर पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात इमाम आणि शफिकने शतकी खेळी केल्या. त्यामुळे पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात ७७ षटकात बिनबाद २५७ धावा झाल्या. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराट कोहली जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा त्याला वाटते की तोच राजा आहे’
नव्या कसोटी क्रमवारीत जडेजा नंबर वन! पंत-विराटही फायद्यात