भारतविरुद्ध टी२० मलिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडसाठी जबरदस्त प्रदर्शन केलेल्या सलामीवीर मार्टिन गप्टिलने भारताच्या रविचंद्रन अश्विनचे कौतुक केले आहे. गप्टिलच्या मते अश्विनच्या विरोधात फलंदाजी करणे खूप अवघड आहे. त्याच्या मते अश्विनचे त्याच्या लाईन अणि लेंथवर चांगल्या प्रकारे नियंत्रण आहे.
दरम्यान, अश्विन मागच्या बऱ्याच काळापासून टी२० क्रिकेट खेळला नव्हता, त्याने टी२० विश्वचषकातून भारताच्या टी२० संघात ४ वर्षांनी पुनरागमन केले आणि त्यानंतर चांगल्या लयीत गोलंदाजी करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यातही त्याने महत्वाची भूमिका पार पाडली.
बुधवारी (१७ नोव्हेंबर) भारताविरुद्ध टी२० मालिकेतील पहिला सामना पार पडल्यानंतर गप्टिलने अश्विनचे कौतुक केले. यावेळी तो म्हणाला, “तो एक हुशार गोलंदाज आहे. त्याचे त्याच्या लाइन आणि लेंथवर चांगल्या प्रकारे नियंत्रण आहे. तो खराब चेंडू फेकत नाही. मला आठवत नाही की, त्याने संपूर्ण कारकिर्दीत कधी खराब चेंडू फेकला असेल. त्याचा गतीमधील बदल इतका अप्रतिम आहे की, त्याच्या विरोधात धावा करणे कठीण होऊन बसते.”
गप्टिलने या सामन्यात ४२ चेंडूत ७० धावा करून न्यूझीलंसाठी महत्वाची भूमिका पार पाडली, तर अश्विनने भारतासाठी दोन महत्वाचे विकेट्स घेतले आणि न्यूझीलंडला मर्यादित १६४ धावसंख्येवर रोखले.
यापूर्वी न्यूझीलंडला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव मिळाला होता. त्यानंतर भारताकडून या सामन्यात मिळालेला हा त्यांचा सलग दुसरा पराभव ठरला. याबाबत गप्टिल म्हणाला की, “मागच्या दोन सामन्यात आम्ही खराब क्रिकेट खेळलेलो नाही. गोष्टी फक्त ही आहे की आम्ही योग्य निकाल मिळवू शकलो नाही. क्रिकेट अशाच प्रकारे चालते. दोन दिवसांपूर्वी विश्वचषकाचा अंतिम सामना आणि नंतर विमानात बसलो आणि अता आम्ही येथे भारताता मालिका खेळत आहोत.”
दरम्यान, पहिल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १९.४ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. रविचंद्रन अश्विनने या सामन्यात चार षटकात २३ धावा देऊन मार्क चॅपमन आणि टिम सिफर्ट या दोघांच्या महत्वाचे विकेट्स एकाच षटकात घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘एबी’ची सर्वप्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्ती, विराट म्हणाला ‘आय लव्ह यू’; पण तुटलेल्या हृदयासह
भज्जीचा नवा लूक! यष्टीरक्षण करताना अप्रतिम झेल घेताच हरभजनने केला भांगडा, व्हिडिओ व्हायरल