टी२० विश्वचषकाच्या मैदानात बुधवारी(३ नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि नामिबिया यो दोन संघांचे एकमेकांसमोर आव्हान होते. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यातच्या सुरुवातीला स्कॉटलंडने नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत असताना मर्यादित २० षटकांमध्ये पाच विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या. न्यूझीलंडसाठी सलामीवीर मार्टिन गप्टिलने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. या सामन्यात गप्टिलचे शतक अवघ्या काही अंतराने हुकले.
गप्टिलने या सामन्यात १६६.०७ च्या स्ट्राइक रेटने ५६ चेंडूत ९३ धावांची दमदार खेळी केली. यामध्ये त्याच्या सहा चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. ही पाचवी वेळ आहे जेव्हा गप्टिलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९० पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. गप्टिल टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ९० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
गप्टिलव्यतिरिक्त भारतातच्या रोहित शर्माने हा पराक्रम केला होता. रोहित शर्मानेही त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाच वेळा ९० धावांचा टप्पा पार केला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल आहे. गेलने चार वेळा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ९० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
तसेच गप्टिल टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये एका वर्षात दोन वेळा ९० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा दुसरा खेळाडू ठरला आहे. ही या वर्षातील दुसरी वेळ आहे, जेव्हा गप्टीलने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ९० धावांची खेळी पूर्ण केली आहे. यावर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात गप्टिलने ९७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर टी-२० विश्वचषकात बुधवारी खेळल्या गेलेल्या स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा ९० धावांचा टप्पा पार केला आहे.
भारताचा शिखर धवन एका वर्षात टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वेळा हा पराक्रम करणारा पहिला खेळाडू आहे. धवनने २०१८ मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० सामन्यात ९० धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने त्याच वर्षी चेन्नईमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध टी२० सामन्यात ९२ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
नवा ‘सिक्सर किंग’: ९३ धावांच्या खेळीसह गप्टिल बनला टी२० चा ‘बॉस’
अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा करणार गोलंदाजी? सराव सत्रात दिसले निराळे दृश्य, पाहा व्हिडिओ
“अफगाणिस्तान असा संघ नाहीये, ज्याला तुम्ही सहजासहजी पराभूत कराल”