---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने ‘या’ दिग्गजालाही केले क्लीन बोल्ड, हिसकावून घेतला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट

On: बुधवार, नोव्हेंबर 23, 2022 9:55 AM
new zealand team
---Advertisement---

नुकतेच न्यूझीलंड पुरूष क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर भारताविरुद्धची टी20 मालिका गमावली. तीन सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामन्यात पावसाने व्यत्यत आणल्याने एक रद्द झाला तर एक डकवर्थ लुईसच्या नियमानुसार बरोबरीत राहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकला. यामुळे ही मालिका भारताने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली 1-0 अशी जिंकली. यजमानांची अशी  कठिण स्थिती असताना मोठी बातमी समोर येत आहे.

न्यूझीलंड पुरूष क्रिकेट संघाच्या आणखी एका खेळाडूला बोर्डने केंद्रीय करारामधून मुक्त केले आहे. वार्षिक करारातून मार्टिन गप्टिल हा बाहेर झाला आहे. त्याच्याआधी दोन खेळाडूंना बोर्डने रिलीज केले होते.

गप्टिल हा ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांच्यानंतर केंद्रीय करारातून मुक्त होणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. या तिघांनीही जागतिक क्रिकेटमध्ये ज्या टी20 लीग आणि टी10 लीग खेळल्या जातात त्यामध्ये खेळण्याची इच्छा जाहीर केली. हे तिघेही त्यामध्ये खेळण्याच्या संधी शोधत आहे, त्यामुळेच त्यांनी केंद्रीय करारातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.

गप्टीलला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच त्याला भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही संघात घेतले नाही. याने निराश न होता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार केलेला नाही आणि वार्षिक करारातून मुक्त होत लीग क्रिकेट खेळण्याची इच्छा दर्शवली.

आयसीसीच्या वृत्तानुसार, गप्टीलने म्हटले, “माझ्या देशासाठी खेळणे हा एक मोठा सन्मान आहे आणि न्यूझीलंड क्रिकेटमधील प्रत्येकाच्या त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे. मात्र, मी सध्याच्या परिस्थितीत पर्यायांचा विचार करण्याची गरज समजून घेण्याबाबात प्रयत्नशील आहे. मी अजूनही न्यूझीलंडसाठी उपलब्ध आहे, मला इतर संधी शोधण्याची संधी आहे आणि मला माझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येईल, जे महत्वाचे आहे.”

गप्टील हा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याचबरोबर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू आहे. Martin Guptill released from New Zealand player central playing contract

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या ७ मिनीटात गॅरी कर्स्टन झाले होते टीम इंडियाचे कोच, पाहा कसे
विश्वचषकाच्या धामधूमीत क्रिस्तियानो रोनाल्डो-मॅंचेस्टर युनायटेड नाते संपुष्टात, क्लबने जाहीर केले ‘हे’ निवेदन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---