---Advertisement---

केवळ अद्भुत! गप्टीलने टिपलेला झेल पाहून तुम्हीही असेच म्हणाल; पाहा व्हिडिओ

On: बुधवार, ऑक्टोबर 20, 2021 1:41 PM
---Advertisement---

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत एकीकडे पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर दुसरीकडे सुपर १२ फेरीतील सामने सुरू होण्यापूर्वी सर्व संघांमध्ये सराव सामन्याचा थरार पाहायला मिळत आहे. दरम्यान सोमवारी (१८ ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला असला तरी देखील चर्चा मात्र मार्टिन गप्टीलने टिपलेल्या झेलची सुरू आहे. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

न्यूझीलंड संघाचा दिग्गज फलंदाज मार्टिन गप्टील हा एक अप्रतिम फलंदाज आहे. परंतु तो किती चांगला क्षेत्ररक्षक आहे, हे त्याने या सामन्यात पुन्हा एकदा सिद्ध केलं.तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५९ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी डेविड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच यांची जोडी मैदानावर आली होती.

त्यावेळी कर्णधार केन विलियमसनने गोलंदाजी करण्याची जबाबदारी टीम साऊथीला दिली. टीम साऊथीच्या पहिल्याच चेंडूवर डेविड वॉर्नरने स्टेप आऊट होऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू बॅटचा कडा घेत स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या मार्टिन गप्टीलच्या हातात गेला. स्लीपमध्ये झेल टिपणे खूप अवघड असते कारण कुठल्या दिशेने जाईल, किती उंचीवर येईल हे समजून घ्यायला अवघ्या काही सेकंदांचा अवघी असतो. तरी देखील गप्टीलने अवघ्या काही सेकंदात डाव्या दिशेने डाईव्ह मारली आणि एका हाताने झेल टिपला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/CVL8spUh-xU/?utm_medium=copy_link

रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने मारली बाजी

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केन विलियमसनने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली होती. तर डेरील मिशेलने ३३ धावांचे योगदान दिले होते.या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटकाअखेर ७ बाद १५८ धावा करण्यात यश आले. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तर मार्कस स्टोइनिसने २८ धावांचे योगदान दिले.या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने सराव सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---