आयर्लंड महिला क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून यजमानांविरुद्ध ४ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यात व्यस्त आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वे महिला संघांचा ही इतिहासातील पहिलीच वनडे मालिका आहे आणि त्यांनी या ऐतिहासिक मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे. झिम्बाब्वे महिलांनी पहिल्या-वहिल्या वनडे सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात कर्णधार मेरी-ऍनी मुसोंडा हिने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच तिने एक विश्वविक्रमी कामगिरी केली आहे.
या सामन्यात आयर्लंड महिलांनी प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २५३ धावा करत झिम्बाब्वेला २५४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून कर्णधार मुसोंडो हिने ११४ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद १०३ धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
त्यामुळे, ती झिम्बाब्वेकडून महिलांच्या वनडेमध्ये शतक करणारी पहिलीच क्रिकेटपटू ठरली आहे. याबरोबरच ती अशी तिसरीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे, जिने देशाच्या महिला संघाच्या पहिल्याच वनडे सामन्यांत शतक केले आहे. यापूर्वी असा विक्रम इंग्लंडच्या लीन थॉमस आणि एनिड बेकवॉल यांनी केली आहे. या दोघींनीही १९७३ साली आंतरराष्ट्रीय महिला एकादश संघाविरुद्ध इंग्लंड महिला संघाने खेळलेल्या पहिल्या-वहिल्या वनडे सामन्यांत शतकं केली होती.
A victory in their maiden ODI for Zimbabwe Women 🤩
They win the opening #ZIMvIRE ODI by four wickets on the back of skipper Mary-Anne Musonda’s stunning 103*!
What an achievement 👏
📸 @zimbabwe_women pic.twitter.com/VIUaybXbVI
— ICC (@ICC) October 5, 2021
झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय
या सामन्यात २५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून मुसोंडोव्यतिरिक्त प्रेशियस मरंगेने २७, जोसेफिन एनकोमोने २५ आणि ऍश्ले एनदिरायाने २४ धावांची खेळी केली. अन्य कोणाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. झिम्बाब्वेने ४३.५ षटकांत ६ विकेट्स गमावत २५४ धावांचे आव्हान पूर्ण केले. आयर्लंडकडून कॅरा मरेने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, आयर्लंडकडून कर्णधार लॉरा डिलेनीने सर्वाधिक ८६ धावा केल्या. तसेच यष्टीरक्षक फलंदाज शौना कवनाघने ३१ धावा केल्या. याव्यतिरिक्त ४ फलंदाज वीशीत बाद झाले. त्यामुळे आयर्लंडने ५० षटकांत ८ बाद २५३ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून जोसेफिन एनकोमो आणि प्रेशियस मरंगेने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर, अन्य तीन गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ‘असं’ झालं! मुंबईने ९ षटकातच विजय मिळवल्याने राजस्थानवर ओढावली नामुष्की
अरर! उर्वशी रौतेलाने एकदिवस उशीरा दिल्या पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल