---Advertisement---

मेरी कोमने झरीनला पराभूत करत ऑलिंपिक क्वालिफायरसाठी पक्के केले स्थान

On: शनिवार, डिसेंबर 28, 2019 7:50 PM
---Advertisement---

सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोमने आज(28 डिसेंबर) निखत झरीनला पराभूत करत पुढील वर्षी चीनमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

मेरी कोमने ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी झालेल्या ट्रायल्समध्ये आज महिलांच्या 51 किलोग्रॅम वजनी गटात निखतवर 9-1 ने विजय मिळवला.

या सामन्याकडे अनेकांचे लक्ष होते, कारण याआधी काही आठवड्यांपूर्वी निखतने ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी समान संधीची मागणी केली होती. त्यानुसार तिने मेरी कोमसाठीही ट्रायल्सची मागणी केली होती. तसेच तिने भारताच्या बॉक्सिंग फेडरेशनच्या(बीएफआय) निवडीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर बीएफआयने मेरी कोमलाही ट्रायल्स खेळण्यास सांगितले होते.

बॉक्सिंग ट्रायल्समधील अन्य सामन्यांमध्ये 57 किलोग्रॅम वजनी गटात सोनिया लाथरला 9-1 अशा फरकाने साक्षी चौधरीने पराभूत केले.

60 किलोग्रॅम वजनी गटात सिमरनजीत कौरने अनुभवी एल सरिता देवीचा 8-2 अशा फरकाने पराभव केला. 69 किलोग्रॅम वजनी गटात लवलिना बोपगेहनने ललिताचा 10-0ने पराभव केला. 75 किलो वजनी गटात पुजा राणीने नुपुरचा 10-1 ने पराभव केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---