---Advertisement---

मोठ्या मनाची मेरी! ‘त्या’ चाहतीला ऑलिम्पिकवेळी दिलेला शब्द पाळला

On: मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 8:40 PM
---Advertisement---

तब्बल सहा वेळा महिला बॉक्सिंगचे विश्वविजेतेपद पटकावणारी भारताची वरिष्ठ बॉक्सर मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभूत झाल्यानंतर कमालीची निराशा झाली होती. सर्व भारतीयांना तिच्याकडून पदकाची अपेक्षा असताना तिचा आश्चर्यकारकरित्या पराभव झालेला. तिच्या पराभवानंतर एका मुलीचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता, मेरीने त्या मुलीची भेट घेत चाहत्यांची मने जिंकली आहेत.

चाहतीला भेटण्याची व्यक्त केली होती इच्छा
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये मेरी कोम हिला महिलांच्या ५१ किलो वजनी गटात कोलंबियन बॉक्सरकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, तिने अश्रू अनावर झालेल्या आपल्या चाहतीचा व्हिडिओ शेअर केला होता. तसेच तिने आपल्या या चाहतीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मेरीने व्हिडीओ शेअर करत लिहीलेले,
‘प्रिय बहिण, मला तुला भेटण्याची संधी मिळाली तर मी तुला मिठी मारेन आणि सलाम करेल. जर तुला कोणत्याही खेळात रस असेल तर मला तुला मदत करायला आवडेल.’

मेरीने पाळला शब्द
ऑलिम्पिक वेळी दिलेला शब्द मेरी कोमने पाळला. तिने आपल्या या चाहतीला शोधून काढले व तीची भेट घेतली. मेरीने या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत लिहिले.
‘मला माझी नवीन चाहती सापडली आहे. ही माझी चाहती टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये माझ्यासाठी मनापासून आनंदी झालेली आणि रडलेलीसुद्धा.’
मेरीच्या या कृत्यामुळे सोशल मीडिया वर अनेकांनी तिच्या स्वभावाचे व मोठ्या मनाचे कौतुक केले आहे.

ऑलिम्पिकमध्ये पराभूत झालेली मेरी
भारताची सर्वात अनुभवी महिला बॉक्सर असलेली मेरी कोम अखेरच्या वेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत होती. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियन बॉक्सरकडून पराभूत झाल्याने ती पदक पटकावू शकली नव्हती. सध्या ३८ वर्षाची असलेली मेरी आगामी ऑलिम्पिक खेळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. तिने यापूर्वी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://mahasports.in/tokyo-olympics-2020-25-th-july-schedule-mary-kom-pv-sindhu-and-g-sathiyan-in-action/amp/&ved=2ahUKEwift6OB9cnyAhV8wzgGHduuC5YQFnoECAQQAQ&usg=AOvVaw3PVgl_1Rcc7nsB5g_6sseH&ampcf=1&cshid=1629816907430

रवी शास्त्रींनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचे मत

भारीच ना! पृथ्वीने ‘किंग’ कोहली अन् संघसहकाऱ्यांसोबत वर्कआऊट करतानाचा फोटो केला शेअर, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---