नवीन वर्षात क्रिकेटपटूंपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. नुकतेच भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल याने अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्यासोबत संसार थाटला. त्यानंतर अष्टपैलू अक्षर पटेल हादेखील लग्नाच्या बेडीत अडकला. अक्षरने फॅशन डिझायनर मेहा पटेल हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. आता आणखी एक बातमी समोर येत आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने गुपचूप लग्न केले आहे.
मसाबा गुप्ता (Masaba Gupta) हिने शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) अभिनेता सत्यदीप मिश्रा (Satyadeep Misra) याच्यासोबत सात फेरे घेतले. आता त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत मसाबाने लग्नाचा खुलासा केला आहे. मसाबाच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरत आहेत. मसाबाच्या लग्नात वडील विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) हेदेखील पोहोचले होते. वडिलांसोबतचा मसाबाचा फोटो चांगलाच चर्चेत आहे.
https://www.instagram.com/p/Cn6EhPbjLLg/?hl=en
मसाबाच्या लग्नात वडील विवियन रिचर्ड्स यांची हजेरी
अभिनेत्री नीना गुप्ता यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये दिसत आहे. फोटोत मसाबा, तिचा पती सत्यदीप, नीना गुप्ता, विवियन रिचर्ड्स, नीना गुप्ता यांचा पती, सत्यदीप याची आई आणि बहीणदेखील दिसत आहेत. सर्वजण या लग्नामुळे खूपच आनंदात असल्याचे दिसत आहे. नीना पती विवेक मेहरासोबत बसल्याचे दिसत आहे. नीना यांनी फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, “मुलगी, नवीन मुलगा, मुलाची आई, मुलाची बहीण, मुलीचे वडील, मी आणि माझा पती.”
https://www.instagram.com/p/Cn6WJPbMUe_/?hl=en
नीना गुप्तांच्या या फोटोला सोशल मीडियावर जोरदार पसंती मिळत आहे.
विवियन रिचर्ड्स यांची कारकीर्द
सर विवियन रिचर्ड्स यांची गणना वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये होते. त्यांनी वेस्ट इंडिजकडून 121 कसोटी सामने आणि 187 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी 50.24च्या सरासरीने 8540 धावा केल्या आहेत. यामध्ये 24 शतके आणि 45 अर्धशतके ठोकली आहेत. याव्यतिरिक्त वनडेत त्यांनी 47च्या सरासरीने 6721 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्यांनी 11 शतके आणि 45 अर्धशतकेही झळकावली आहेत. (masaba gupta satyadeep misra wedding vivian richards attend daughter masaba wedding photos viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकच पराभव आणि टीम इंडियाला बसतील 3 धक्के! बादशाहतही धोक्यात
अश्विनचा रोहितच्या टीम इंडियाला पाठिंबा! म्हणाला, ‘सचिनलाही चॅम्पियन बनण्यासाठी 6 वर्ल्डकप खेळावे लागलेले’