पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानात विराट कोहली याचं नाणं खणकलं. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना हा विराट कोहलीचा 500वा सामना होता. या सामन्यात भारताच्या पहिल्या डावाच्या दुसऱ्या दिवशी विराटने शतक ठोकले. हे विराट कोहलीचे 29वे कसोटी शतक होते. विराटच्या या शतकानंतर त्याच्यावर क्रिकेटजगतातून अभिनंदनाचा पाऊस पडला. कौतुक करणाऱ्यांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचाही समावेश होता. विराटचे शतक पाहून सचिनही त्याच्यावर फिदा झाला.
विराट कोहलीने मोडला सचिनचा विक्रम
विराट कोहली (Virat Kohli) याने शानदार शतक ठोकत खास पराक्रम गाजवला. विराट 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज बनला. त्याने या विक्रमात महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचाही विक्रम मोडीत काढला. सचिनने 500 आंतरराष्ट्रीय सामन्यांपर्यंत एकूण 75 शतके केली होती. आता आपलाच विक्रम मोडल्यानंतर सचिनने विराटचे अभिनंदन केले. सचिन तेंडुलकर इंस्टाग्राम स्टोरी (Sachin Tendulkar Instagram Story) याचा वापर करून सर्वांचे लक्ष वेधत आहे. सचिनने स्टोरीवर विराटचा फोटो शेअर करत लिहिले की, “आणखी एक दिवस, विराट कोहलीच्या बॅटमधून आणखी एक शतक. चांगलं खेळलास.”
Sachin Tendulkar's Instagram story for Virat Kohli.
God of cricket 🤝 King of cricket. pic.twitter.com/kvpPcATzaI
— Johns. (@CricCrazyJohns) July 21, 2023
विराट कोहली धावबाद होऊन तंबूत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतकापासून हुकलेल्या विराटने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 206 चेंडूंचा सामना करत 121 धावा चोपल्या. या डावादरम्यान विराटने 11 चौकार मारले आणि 77 धावा पळून काढल्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 76वे शतक ठरले. यावेळी त्याने 61 धावा करणाऱ्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी रचत संघाला पुनरागमन करण्यात मदत केली.
विराट धावबाद झाल्यानंतर जडेजानेही केमार रोच याच्या गोलंदाजीवर बाद झाला. लंच ब्रेकपर्यंत ईशान किशन (18) आणि आर अश्विन (6) धावांवर खेळत होते. पुढे अश्विनने अर्धशतक केले. तो 78 चेंडूत 56 धावा करून बाद झाला, तर ईशानने 25 धावा केल्या.
पाच वर्षांनंतर ठोकले शतक
दिवसाची सुरुवात 87 धावांनी करणाऱ्या विराटने केमार रोचच्या चेंडूवर चौकार मारत शतक झळकावले. त्याने परदेशात 2018मध्ये (पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध) शेवटचे शतक केले होते. त्यानंतर तब्बल 5 वर्षांनंतर हे त्याचे पहिले शतक होते. विशेष म्हणजे, हे विराटचे वेस्ट इंडिजविरुद्धचे 12वे शतक आहे. या संघाविरुद्ध सर्वाधिक शतकांच्या विक्रमाच्या यादीत विराट जॅक कॅलिससह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 13 शतके ठोकली होती. (master blaster sachin tendulkar lauds virat kohli for his 29th test century know how)
महत्त्वाच्या बातम्या-
शतकानंतर विराटच्या वक्तव्याने जिंकले 140 कोटी भारतीयांचे मन; म्हणाला, ‘माझ्यासाठी रेकॉर्ड महत्त्वाचा नाही…’
विराटच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात चोपल्या 438 धावा, वाचा दुसऱ्या दिवशी काय-काय घडलं