आयसीसी टी20 रँकिंगमध्ये अव्वलस्थानी असणाऱ्या सूर्यकुमार यादव याने आयपीएल 2023च्या 57व्या सामन्यात अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स संघातील या सामन्यात मुंबईच्या विस्फोटक फलंदाजाने 49 चेंडूत नाबाद 103 धावांची झंझावाती खेळी केली. यासह सूर्याने 120व्या डावात आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. या खेळीत सूर्याने 6 षटकार आणि 11 चौकारांचा पाऊस पाडला. यादरम्यान सूर्याने 19व्या षटकात मोहम्मद शमी याच्या एका चेंडूवर डीप थर्डमॅनच्या दिशेने षटकार ठोकला. हा शॉट पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हादेखील हैराण झाला.
सूर्यकुमार यादवचा खतरनाक शॉट
झाले असे की, मुंबई इंडियन्सच्या डावातील 19वे षटक गुजरातकडून मोहम्मद शमी टाकत होता. षटकातील दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने डीप थर्डमॅनच्या दिशेने मारला. हा चेंडू थेट षटकारासाठी गेला. हा शॉट पाहून गोलंदाज शमीही हसताना दिसला. तसेच, ड्रेसिंग रूममध्ये बसलेला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हादेखील हैराण झाला. यावेळी सचिनची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. त्याची रिऍक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
One of the Crazy shot ever.
Take a bow, Surya. pic.twitter.com/ygbHAydGVy
— Johns. (@CricCrazyJohns) May 12, 2023
सामन्याचा आढावा
खरं तर, सूर्यकुमार यादव याच्या शतकाच्या जोरावर मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्सचा त्याग करत 218 धावांचा डोंगर उभारला होता. यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना राशिद खान याने सर्वाधिक 4 विकेट्स आणि मोहित शर्मा याने 1 विकेट घेतली होती.
मुंबईच्या 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाला 8 विकेट्स गमावत 191 धावाच करता आल्या. यावेळी गुजरातकडून राशिद खान याने अष्टपैलू खेळ दाखवला. आधी गोलंदाजीत आणि नंतर फलंदाजी करताना त्याने खोऱ्याने धावा काढल्या. यावेळी राशिदने फक्त 32 चेंडूंचा सामना करताना नाबाद 79 धावा केल्या. या धावा करताना त्याने चौकार कमी आणि षटकार जास्त मारले. त्याने 3 चौकार आणि तब्बल 10 षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त फक्त डेविड मिलर यालाच 41 धावा करता आल्या. इतर एकही फलंदाज खास खेळी करू शकला नाही. त्यामुळे गुजरातला 27 धावांनी पराभव पत्करावा लागला. (master blaster sachin tendulkar reaction viral on surya kumar yadav shot in mi vs gt IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
ही दोस्ती तुटायची नाय! सूर्याच्या सेंच्युरीवर विराटकडून मराठीत कौतुक, काय म्हणाला वाचाच
सूर्याचा सचिनला मागे टाकणारा विक्रम! दिग्गजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी