---Advertisement---

‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे सामन्यात पडला फरक; सेहवागने दिली प्रतिक्रिया

On: रविवार, सप्टेंबर 20, 2020 7:35 PM
---Advertisement---

आयपीएल 2020 चा पहिला सामना चार वेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा चषकावर नाव कोरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) दरम्यान खेळला गेला. या सामन्यात सीएसकेने 5 विकेट्सने विजय मिळवून मागच्या हंगामात अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतला.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 बाद 162 धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्जने पाच गडी गमावून अखेरच्या षटकात विजय मिळविला. अंबाती रायडूला 71 धावांच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एमएस धोनी 2019 मधील वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीनंतर मैदानात परतला.

चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाबद्दल ट्विटरवर आल्या प्रतिक्रिया

चेन्नई सुपर किंग्जच्या या विजयानंतर ट्विटरवर जबरदस्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अ‍ॅल्बी मॉर्केल यांने सीएसकेच्या विजयाचे कौतुक केले. त्यांने ट्विट केले की “सीएसकेने जबरदस्त सुरुवात केली.”

https://twitter.com/albiemorkel/status/1306954669772517376

एमएस धोनीच्या 14 महिन्यांनंतर मैदानात परत येण्यावर एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली. तिने धोनीला ‘थलाईवा’ असे संबोधले आहे.

माजी क्रिकेटपटू  वीरेंद्र सेहवागने लिहिले, “आयपीएलची जबरदस्त सुरुवात. अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसीसने उत्कृष्ट खेळ दाखवला पण सॅम करनची खेळी जबरदस्त होती आणि त्याच्याच डावामुळे सामन्यात फरक पडला.”

https://twitter.com/virendersehwag/status/1307377303194746885

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अंबाती रायडूच्या खेळीचे कौतुक केले आहे.

https://twitter.com/humasqureshi/status/1307373318215958529

दिग्गज समालोचक आकाश चोप्रानेही अंबाती रायडूच्या खेळीचे कौतुक केले आहे. याव्यतिरिक्त इरफान पठाणनेही चेन्नई सुपर किंग्जच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सांगितले की गोलंदाजीदरम्यान सातत्यपूर्ण बळी घेतल्यामुळे चेन्नई संघाचा विजय झाला.

https://twitter.com/IrfanPathan/status/1307376584685268992

भारतीय संघाचा माजी खेळाडू आरपी सिंगने चेन्नई संघाची व फाफ डुप्लेसिसची प्रशंसा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना कुठे आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर माहिती

-एकतर षटकार मारेन किंवा बाद होईल ही मानसिकता घेऊनच खेळलो; पहा कोण म्हणतंय

-‘या’ संघाच्या कर्णधाराला हवंय खास गिफ्ट, जे बनवेल त्याचा आयपीएल हंगाम खास

ट्रेंडिंग लेख-

-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान

-कहर धोनीचा! पहिल्याच आयपीएल सामन्यात नावावर केले एक-दोन नव्हे तर ३ किर्तीमान

-श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---