---Advertisement---

श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा

On: रविवार, सप्टेंबर 20, 2020 3:44 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसदरम्यान युएईमध्ये आयपीएलच्या १३व्या हंगामाचे आयोजन करण्यात आले आहे. या हंगामातील दुसरा सामना आज (२० सप्टेंबर) दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला जाईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. Probable Playing Of Delhi Capitals And Kings XI Punjab

अशात यावर्षी विजयाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या दिल्ली संघाकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरतील. तर कर्णधार श्रेयस अय्यर, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस हे मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरु शकतात.

याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा दिल्लीच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग असणे पक्के आहे. रबाडाव्यतिरिक्त डैनियल सॅम्सलाही पहिल्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. तसेच अमित मिश्रा, आर अश्विन आणि हर्षल पटेल यांनाही अंतिम ११मध्ये सहभागी करण्यात येईल.

पंजाब संघाकडून ख्रिस गेल आणि कर्णधार केएल राहुल सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरु शकतात. तर मयंक अगरवाल, सरफराज खान, मनदिप सिंग आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या खांद्यावर मधल्या फळीत फलंदाजी करण्याची जबाबदारी असेल. शिवाय मोहम्मद शमी आणि क्रिस जॉर्डन हे वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळतील.

तर कृष्णप्पा गौतम, मुजीब उर रहमान आणि रवि बिश्नोई या फिरकी गोलंदाजांनाही अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकते.

दिल्ली कॅपिटल्सचा संभावित अंतिम ११ संघ –

शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रिषभ पंत, मार्कस स्टोइनिस, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, डैनियल सैम्स, अमित मिश्रा आणि आर अश्विन

किंग्स इलेव्हन पंजाबचा संभावित अंतिम ११ संघ –

ख्रिस गेल, केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, सरफराद खान, मनदिप सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, मुजीब उर रहमान, रवि बिश्नोई आणि कृष्णप्पा गौतम

महत्त्वाच्या बातम्या –

यंदा आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने सीएसकेला दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला…

फाफ डू प्लेसिसचा सल्ला न ऐकणे मुरली विजयला पडले भलतेच महागात

कागिसो रबाडासाठी या ३ फलंदाजांना बाद करणे ठरणार आव्हान; जाणून घ्या कोण आहेत ते ३ फलंदाज

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी…

सौरभ तिवारी आणि मुंबई इंडियन्स ‘ये रिश्ता कुछ तो कहलाता है’

‘तो’ संघ जो आयपीएलची सुरुवात होण्याआधीच बनतो अंतिम सामन्याचा दावेदार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---