टी20 विश्वचषक (T20 World Cup)2022च्या पर्वामध्ये शुक्रवारी (28 ऑक्टोबर) क्रिकेटचाहत्यांसाठी निराशाजनक ठरला, कारण या दिवसाचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाले. पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड असा होता, तर दुसरा सामना अत्यंत महत्वाचा असा ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात खेळला जाणार होता. हे दोन्ही सामने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळले जाणार होते, मात्र पावसाने सर्वांच्या आशांवर पाणी फेरले. हे दोन्ही सामने नाणेफेक न होताच रद्द झाले. याचा फायदा मात्र ऑस्ट्रेलिया-इंग्लंडला झाला आहे.
अफगाणिस्तान, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे सुपर 12च्या ग्रुप एकमध्ये आहेत. यामुळे शुकवारचा सामना या चारही संघांसाठी महत्वाचा होता. या सामन्याआधी या ग्रुपची गुणतालिका पाहिली तर ऑस्ट्रेलिया-इंग्लंडची स्थिती खूपच वाईट होती. त्यामध्ये आता सुधारणा झाली आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळण्यापूर्वी यजमान संघ आणि गतविजेता ऑस्ट्रेलियाने या विश्वचषकात 2 सामने खेळले. त्यातील एका सामना जिंकला, एक गमावला होता. त्यामुळे ते गुणतालिकेत तळाला होते. पहिल्या सामन्यात त्यांना न्यूझीलंडने 89 धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे त्यांचा नेट रनरेटही खूपच कमी होता. अशात त्यांना इंग्लंडविरुद्धचा सामना रद्द झाल्याने नुकसान नाही तर फायदा झाला आहे. त्यांनी गुणतालिकेत 3 पॉइंट्स मिळवत चौथे स्थान पटकावले आहे.
इंग्लंडही हा सामना होण्याआधी चौथ्या स्थानावर होता. त्यांनी आता आयर्लंडला मागे टाकत दुसरे स्थान गाठले. इंग्लंडने आतापर्यंत या स्पर्धेत 3 सामने खेळले आहेत. त्यातील एक सामना जिंकला, एक गमावला तर एकाचा निकालच (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) लागला नाही.
Match abandoned at the MCG ☔#T20WorldCup | #England pic.twitter.com/atadXUBWFw
— England Cricket (@englandcricket) October 28, 2022
न्यूझीलंडने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले असून एक सामना जिंकला तर एक सामना रद्द झाला होता. त्यामुळे ते गुणतालिकेत 3 पॉइंट्सह आणि उत्तम नेट रनरेटमुळे (+4.450) पहिल्या स्थानावर आहेत.
ऑस्ट्रेलियाचे केवळ दोनच सामने बाकी आहेत. त्यातील पहिला सामना 31 ऑक्टोबरला आयर्लंडविरुद्ध ब्रिसबेन येथे, तर दुसरा सामना 4 नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध ऍडलेड येथे खेळणार आहे. स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हे दोन्ही सामने जिंकणे अत्यावश्यक आहे, मात्र हे दोन्ही सामने रद्द झाले नाही तर ऑस्ट्रेलियासाठी बरे होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“दक्षिण आफ्रिकेकडे रबाडा अन् नॉर्किया असतील, तर आमच्याकडे विराट भाई आहे”
ये दुख काहे खतम नहीं होता! झिम्बाब्वेने पाकिस्तानला पाजलं पराभवाचं पाणी, बाबरची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद