पुणे पलानी टस्कर्स विरुद्ध नांदेड चांबल चॅ लेंजर्स यांच्यात महत्वपूर्ण लढत झाली. नांदेड संघ 18 गुणांसह चौथ्या स्थानी होता हा सामना जिंकून दुसऱ्या स्थानावर जाण्यासाठी त्याचा प्रयत्न होता तर पुणे संघ सातव्या स्थानी होता. सामन्याची सुरुवात दोन्ही संघाकडून अतिशय संथ व संयमी झाली. एक किंवा दोन गुणांच्या आघाडी वर कोणत्याही संघाला जाता आला नाही. कधी नांदेड तर कधी पुणे संघ आघाडी घेत होता. पहिल्या दहा मिनिटानंतर सामना 10-10 असा बरोबरीत सुरू होता.
नांदेड कडून अजित चव्हाण व अक्षय सूर्यवंशी तर पुणे कडून भूषण तपकीर व आर्यन राठोड गुण मिळवत होते. मध्यंतराला पुणे संघाकडे 16-15 अशी नाममात्र 1 गुणांची आघाडी होती. दोन्ही संघांनी चढाईत 12-12 असे गुण मिळवले होते तर पुणे संघाने पकडीत 1 अधिक गुण मिळवला होता. मध्यांतरा नंतर पुणे संघाने आक्रमक सुरुवात करत 24-18 आघाडी मिळवली होती मात्र ती जास्त काळ टिकवता आली नाही. अजित चव्हाण व अक्षय सूर्यवंशी ने आक्रमक चढाया करत पुन्हा सामना 30-30 असा बरोबरीत आणला.
सामन्यात शेवटच्या 4 मिनिटात दोन्ही संघांनी सावध खेळ करत सामना 32-32 असा बरोबरीत ठेवण्यात समाधान मानले. नांदेड कडून अजित चव्हाण ने चढाईत 11 गुण मिळवले तर अक्षय सूर्यवंशी ने 9 गुण मिळवले. तर भूषण बोरुडे ने 3 पकडी केल्या. पुणे कडून आर्यान राठोड ने 9 गुण मिळवले तर भूषण तपकीर ने 8 गुण मिळवले. पकडीत पृथ्वीराज शिंदे व ऋषिकेश पाटील ने प्रत्येकी 3 पकडी केल्या. (Match between Pune Palani Tuskers vs Nanded Chambal Challengers Draw)
बेस्ट रेडर- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर- अभिषेक बोरुडे, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- भूषण तपकीर, पुणे पलानी टस्कर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुखापतग्रस्त पंतच्या फिटनेसची नवी अपडेट, वनडे विश्वचषकातून पत्ता कट!
ठाणे हम्पी हिरोजकडून कोल्हापूर संघाला धक्का