---Advertisement---

एकवेळ ०-२ असे पिछाडीवर असलेल्या बेल्जियमचा जपानवर रोमहर्षक विजय

On: मंगळवार, जुलै 3, 2018 7:43 AM
---Advertisement---

सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सहाव्या सामन्यात बेल्जियमने जपानला ३-२ ने पराभूत करत स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले.

या विजयानंतर तब्बल ३२ वर्षानंतर बेल्जियमने फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे.

या पराभवानंतर स्पर्धेबाहेर पडलेल्या जपानने या सामन्यात चांगाला खेळ केला मात्र ते विजय मिळवू शकले नाहीत.

पहिला हाफ बरोबरीत सुटल्यानंतर ४८ व्या मिनिटाला जपानच्या जेनकी हारागुचीने पहिला गोल करत आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर ५२ व्या मिनिटाला ताकाशी इनुईने दुसरा गोल करत जपानला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

तर पिछाडीवर पडलेल्या बेल्जियमने देखील ६९ व्या आणि ७४ व्या मिनिटाला गोल करत सामन्यात पुनरागमन केले. बेल्जियमसाठी अनुक्रमे जन वर्टोगन आणि फेलैनी यांनी गोल केले.

निर्धारीत वेळेत सामना बरोबरीने सुटल्यानंतर अतिरीक्त वेळेच्या ४ थ्या मिनिटाला बेल्जियमच्या नासेर चेडली विजयी गोल केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘रिश्तो में हम तुम्हारे बाप लगते हैं’ म्हणणाऱ्या…

-भारतीय फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment