२०१८ फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतील आठव्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडने कोलंबियाला पराभूत करत उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले.
मंगळवार, ३ जुलैला झालेल्या या सामन्यात इंग्लंडने कोलंबियाला पेनाल्टी शूट आउटमध्ये ४-३ ने पराभूत केले.
जागतिक फिफा क्रमवारीत इंग्लंड आणि कोलंबिया अनुक्रमे १३ व १६ व्या स्थानावर आहेत.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघाकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन झाले मात्र यामध्ये ते गोल करु शकले नाहीत. पहिल्या हाफमध्ये सामना ०-० असा बरोबरीत राहिला.
दुसऱ्या हाफमध्ये कर्णधार हॅरी केनने ५७ व्या मिनिटाला पेनाल्टी किकवर गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
तर इंजुरी टाइममध्ये कोलंबियाच्या येरी मिनाने ९०+ ३ मिनिटाला हेडद्वारे अप्रतिम गोल करत सामना जादा वेळेत ढकलला.
जादा वेळेतही इंग्लंड आणि कोलंबियाने आक्रमक खेळ करत सामना १-१ असा बरोबरीत सोडवला.
त्यानंतर झालेल्या पेनाल्टी शूट आउटमध्ये इंग्लंडने कोलंबियाला ४-३अशी धूळ चारत १२ वर्षानंतर उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले.
पेनाल्टी शूट आउटमध्ये इंग्लंडकडून केन, रशफोर्ड, ट्रिपर आणि एरिक डायरने गोल केले. तर कोलंबियातर्फे कर्णधार फालकाओ, जुआन कार्डो आणि लुइस मुरिलने गोल केले.
७ जुलैला उपांत्य पूर्व फेरीत इंग्लंड स्वीडनशी दोन हात करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक: तब्बल २४ वर्षानंतर स्वीडनने केला विश्वचषकात…
-पांढरी दाढी ठेवून खेळणार पुढचा फिफा विश्वचषक- सर्जियो रॅमोस