---Advertisement---

‘आता 200 धावा केल्या आहेत…’, विश्वचषकातील निवडीच्या प्रश्नावर ईशानचे मोठे वक्तव्य

Ishan-Kishan
---Advertisement---

सध्या क्रिकेटविश्वात ईशान किशन या युवा विस्फोटक फलंदाजाची सर्वत्र चर्चा रंगली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळताच ईशानने त्याचे सोने केले आणि भारतीय संघाला विजयी बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याने यादरम्यान वनडेतील जलद द्विशतक साजरे केले. यानंतर त्याच्यावर दिग्गज खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षावही झाला. अशात त्याने पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघात निवड होण्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चला तर पाहूया काय म्हणाला आहे ईशान…

ईशान किशनची प्रतिक्रिया
मॅचविनर ईशान किशन (Ishan Kishan) याने या मजेशीर अंदाजात म्हटले की, त्याने 200 धावा केल्या आहेत, काय माहिती आता त्याला विश्वचषक (World Cup) संघात त्याला जागा मिळेल. ईशान सांगतो की, तो फक्त धावा करण्यावर लक्ष देत आहे.

पुढील वर्षी वनडे विश्वचषकाचे आयोजन भारतात होणार आहे. भारतीय संघाकडे सलामीसाठी भरपूर पर्याय आहेत. भारताकडे आधीपासूनच शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यासारखे सलामीवीर आहेत. दुसरीकडे, शिखर धवन हादेखील संघात आहे. याव्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड हादेखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावांचा पाऊस पाडत आहे. त्यामुळे आता सलामीसाठी भारतीय खेळाडूंमध्ये चांगलीच स्पर्धा आहे.

मात्र, ईशान किशनने द्विशतक ठोकत आपली दावेदारी मजबूत केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेनंतर किशनला त्याच्या विश्वचषकातील संघात स्थान मिळवण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

‘काय माहिती संघात संधी मिळून जाईल’
या प्रश्नाचे उत्तर देताना ईशान किशन म्हणाला की, “मला या सर्व गोष्टींबद्दल माहिती नाही. मी फक्त माझ्याकडून कामगिरी करू शकतो. मला काही बोलायचे नाही, माझी बॅटच बोलेल. आता मी 200 धावा केल्या आहेत, काय माहिती संघात संधी मिळून जाईल.”

ईशान किशनची खेळी
ईशान किशन याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात चौकार आणि षटकारांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्याने 131 चेंडूंचा सामना करताना 210 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 10 षटकार आणि 24 चौकारही मारले. ईशान आणि विराटने दुसऱ्या विकेटसाठी 290 धावांची भागीदारी रचली होती. ईशानने 85 चेंडूत आपले शतक साजरे केले होते. तसेच, त्याने 126 चेंडूत द्विशतक साजरे करण्याचा विश्वविक्रम बनवला. (match winner ishan kishan reacts on his world cup selection question)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलाम तुझ्या समर्पणाला! 3 दिवसांपूर्वी पडले होते 4 दात, आता पुनरागमन करत संघाला बनवले विजयी
वाढलेल्या पोटामुळे लाईव्ह सामन्यात पंचांवर मान खाली घालण्याची वेळ, बाबर आझमने काय केले पाहाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---