---Advertisement---

अर्रर्र…काय झालं! 140 कोटी भारतीयांमध्ये फक्त श्रद्धा कपूरच सिराजवर नाराज; म्हणाली, ‘आता त्यालाच विचारा…’

On: सोमवार, सप्टेंबर 18, 2023 10:39 AM
Mohammed-Siraj-And-Shraddha-Kapoor
---Advertisement---

रविवारी (दि. 17 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 50 धावांवर रोखले होते. तसेच, 6.1 षटकातच 51 धावा करून 10 विकेट्सने सामना जिंकला. या विजयाचा शिल्पकार मोहम्मद सिराज ठरला. सिराजने त्याच्या एकाच षटकात 4 विकेट्स घेत श्रीलंकेचं कंबरडं मोडलं होतं. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सिराजवर भलतीच नाराज आहे. यामागे नेमकं काय कारण आहे, चला जाणून घेऊयात…

खरं तर, भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील अंतिम सामन्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमींनी आपले प्लॅन्स रद्द केले होते. भारताने हा सामना एकतर्फी जिंकला. सिराजने चाहत्यांची रविवारची पार्टी लवकर संपवण्याचे काम केले. प्रत्येकाला वाटत होते की, या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळेल. मात्र, सिराजने अशी काही गोलंदाजी केली, ज्यामुळे सामना काही तासांमध्येच संपला. अशाप्रकारे काही चाहत्यांसाठी रविवारचा दिवस कंटाळवाना गेला. त्यात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिच्या नावाचाही समावेश होता. श्रद्धा भारतीय संघाचे सामने नेहमी पाहते. मागेही डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात जेव्हा शुबमन गिल याच्या वादग्रस्त विकेटविषयी श्रद्धाने इंस्टाग्रामवरून मत मांडले होते.

श्रद्धा कपूर इंस्टाग्राम स्टोरी (Shraddha Kapoor Instagram Story) शेअर करत म्हणाली की, आता सिराजलाच विचारा पुढे काय करायचं आहे. तिने स्टोरीवर आपला फोटो शेअर करत लिहिले की, “आता सिराजलाच विचारा की, या मोकळ्या वेळेसोबत काय करायच?” श्रद्धाची ही स्टोरी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Shraddha-Kapoor-Instagram-Story
Photo Courtesy: Instagram/shraddhakapoor

सामन्याविषयी थोडक्यात
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेचा अंतिम सामना दुपारी जवळपास पाऊणे चार वाजता सुरू झाला होता. तसेच, जवळपास 6 वाजेपर्यंत सामन्याचा निकाल लागला. श्रीलंका संघाचा डाव 15.2 षटकात 50 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने 6.1 षटकात 51 धावा केल्या आणि विजय मिळवला. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत भारतीय खेळाडू भारतातही पोहोचले होते. (match winner mohammed siraj ended everyones sunday plans early shraddha kapoor asks what to do)

महत्वाच्या बातम्या-
आशिया चषक विजेता कॅप्टन Rohitचा आनंद गगनात मावेना; म्हणाला, ‘मी विचारच केला नव्हता…’
यहाँ के हम सिकंदर! भारत बनला सर्वाधिक Asia Cup ट्रॉफी जिंकणारा संघ; पाकिस्तान तळाशी, Winners List

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---