रविवारी (9 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंग याने आयपीएलमध्ये अविश्वसनीय खेळी केली. गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार मारून रिंकूने केकेआरला विजय मिळवून दिली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला या सामन्यात 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. रिंकू सिंग याला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर बोलताना त्याने या कामगिरीचे श्रेय आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्तींना दिले.
धावांचा पाठलाग करताना रिंकूने 21 चेंडूत नाबाद 48 धावा कुटल्या. विशेष म्हणजे शेवटच्या सात चेंडूंपैकी सहा चेंडूंवर त्याने षटकार मारले. शेवटच्या षटकात विजयासाठी केकेआरला 29 धावांची आवश्यकता होती. पहिल्याच चेंडूवर उमेश यादव याने एक धाव घेत रिंकूला स्ट्राईक दिली. पुढच्या पाचही चेंडूवर रिंकूने पाच षटकार मारत केकेआरला जबरदस्त विजय मिळवून दिला. आयपीएल इतिहासात अशी कामगिरी प्रथमच घडली आहे.
या कामगिरीनंतर सामनावीर पुरस्कार स्वीकारताना तो म्हणाला,
“मी शेतकऱ्यांच्या कुटुंबातून येतो. माझ्या या प्रवासात माझ्या वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. मी प्रत्येक चेंडू जो षटकार मारत होतो त्यावेळी मला त्या लोकांचा त्याग आठवत होता, ज्यांनी मला पाठिंबा दिला आहे.”
तो पुढे म्हणाला,
“अखेरच्या षटकात इतक्या धावा होणार याबाबत होतील की नाही हे मला माहीत नव्हते. केवळ आपण काहीतरी करू शकतो असा विश्वास होता. अखेर ती गोष्ट घडली.”
देशांतर्गत क्रिकेटमध्ये युपीसाठी खेळणारा रिंकू मागील पाच वर्षांपासून केकेआर संघाचा भाग आहे. केकेआर संघ व्यवस्थापन त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देते. रिंकू अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला असून, त्याचे वडील सुरुवातीला सिलेंडर डिलीव्हरी देण्याचे काम करत. वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षी रिंकूला देखील साफसफाई करण्याची नोकरी ऑफर केली गेली होती. मात्र, त्याने अखेर क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
(Match Winner Rinku Singh Said My Father Sacrifice Lot For Me)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रत्नागिरी अरावली ॲरोजचा तिसरा विजय
ठाणे हम्पी हिरोज पुन्हा अव्वल स्थानी