हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या मॅचवीक ७ मध्ये अधिक रोमांच, थरार आणि अकल्पनीय पुनरागमन झालेले पाहायला मिळाले. या ॲक्शन-पॅक मॅचवीमध्ये प्रेक्षकांना एकूण १८ गोल्स पाहायला मिळाले, ज्यात हिरो आयएसएलच्या या पर्वातील शंभराव्या गोलचा समावेश आहे. या आठवड्यातील सर्वात मोठ्या ठळक घडामोडी पुन्हा पाहूया…
पुरेशी विश्रांती अन् राखीव खेळाडूंची दमदार कामगिरी
हिरो आयएसएलच्या या पर्वात मॅचवीक ७ मध्ये संघांना पुरेशी विश्रांती मिळाली आणि संघांनी त्याचा फायदा उचलला. अनेक संघांनी त्यांच्या सुरुवातीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नवीन प्रतिभावंत खेळाडूंना खेळवले आणि आवश्यकता असताना काही स्टार्स खेळाडूंना बेंचवर ठेवले.
मॅचवीक ७ च्या दुसऱ्या सामन्यात ओडिशा एफसीने सॉल्ट लेक स्टेडियमवर उल्लेखनीय कामगिरी करताना पिछाडीवरून ईस्ट बंगाल एफसीला पराभूत केले. हाफ टाईममध्ये ओडिशा एफसी ०-२ असे पिछाडीवर होते, परंतु मुख्य प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांनी चार बदली खेळाडू मैदानावर उतरवताना फासे टाकले आणि दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी चार गोल केले, ज्यापैकी तीन गोल हे राखीव खेळाडूंकडून आले. ओडिशाला तीन गुण मिळाले. पेड्रो मार्टिनने आल्यानंतर अवघ्या दोन मिनिटात दोन गोल केले.
चेन्नईयन एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्या लढतीतही राखीव खेळाडू चर्चेचा विषय ठरले. सामन्याच्या अंतिम क्वार्टरच्या एका मिनिटाला मुख्य प्रशिक्षक थॉमस ब्रडारिक यांनी व्हिन्सी बॅरेटो आणि अब्देनेसर अल खयाती यांना मैदानावर उतरवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सामना १-१ असा बरोबरीत होता. काही क्षणांनंतर, बरेटोने गोल केला आणि त्याला अल खयातीने सहाय्य केले. त्यानंतर काही वेळातच, अल खयाती स्वत: जमशेदपूरचा बचाव भेदताना गोल करून चेन्नईयन एफसीला ३-१ असा विजय मिळवून दिला.
केरळा ब्लास्टर्सचे पुनरागमन अन् आयएसएल २०२१-२२च्या फायनलचा वचपा
हैदराबादमधील जी.एस.सी. बालयोगी ॲथलेटिक स्टेडियमवर हैदराबाद एफसी व केरळा ब्लास्टर्स एफसी यांच्यातील सामना हा गेल्या वर्षीच्या हिरो आयएसएल फायनलची पुनरावृत्ती होती. यजमान हैदराबादने ६ सामन्यांत ५ क्लीन शीट ठेवल्यामुळे सामन्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण इव्हान व्हुकोमानोव्हिचच्या केरळा ब्लास्टर्स संघाने गतविजेत्यांचा विजयरथ रोखला आणि त्यांची अपराजित मालिका संपुष्टात आणली. या पर्वात प्रथमच हैदराबादला गोल करता आला नाही. केरळा ब्लास्टर्सने हे सर्व करताना सलग तिसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
फेरांडोचा त्यांच्या माजी संघाकडून पराभव आणि आयएसएलमधील शतकी गोलमध्ये मुंबई सिटी एफसीचे योगदान
मुंबई सिटी एफसीने एका सामन्यात सहा गोल करून सातत्य राखले आहे. मॅचवीक ६ मधील ६-२ अशा विजयानंतर, मुंबई सिटीने बंगळुरू एफसीवर ४-० असा विजय मिळवला. हे चारही गोल वेगवेगळ्या खेळाडूंकडून आले आणि पुन्हा एकदा मुंबई सिटीच्या आक्रमकतेची धार तीव्र असल्याचे स्पष्ट झाले. हा त्यांचा चौथा विजय ठरला आणि मोसमातील तिसरा क्लीन शीट होता.
मॅचवीक ७ मध्ये एफसी गोवाने एटीके मोहन बागान एफसी विरुद्ध विजयहीन मालिका संपुष्टात आणली. एफसी गोवाने मोहन बागानविरुद्ध केवळ तीन गोल केले नाहीत तर क्लीन शीटही ठेवली. या सामन्यातील त्यांच्याकडून झालेला पहिला गोल हा आयएसएलच्या या पर्वातील शंभरावा गोल ठरला. एटीके मोहन बागानला या मोसमात प्रथमच गोल करण्यात अपयश आले.
मॅचवीक ७ च्या शेवटच्या सामन्यात राखीव खेळाडू पुन्हा चर्चेत आले, कारण दुसऱ्या हाफमध्ये मोहम्मद फारेस अर्नाउट आणि नोआ सदौई यांनी सामन्यातील दुसरा आणि तिसरा गोल नोंदवला. एफसी गोवाला विजय मिळवून दिला. कार्लोस पेना यांच्या संघाने माजी प्रशिक्षकांवर विजय मिळवला.
एक आनंददायक मॅचवीक संपत असताना, पुढील आठवड्यात आणखी दमदार खेळ पाहायला मिळणार आहे. ओडिशा एफसी चेन्नईयन एफसीचे घरच्या मैदानावर यजमानपद राखून पुनरागमनाच्या विजयानंतर त्यांची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर एफसी गोवा बंगळुरू एफसीसोबत मुकाबला करणार आहे, ज्यांनी चार सामन्यांमध्ये गोल केलेले नाहीत. आठवड्याच्या शेवटी एटीके मोहन बागान आणि हैदराबाद एफसी यांचा सामना होईल. मुंबई सिटी एफसीने दमदार खेळ करून हैदराबादवर दडपण निर्माण केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसाची दादागिरी! सुपर ओव्हर न खेळवता भारत- न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना टाय
भले-भले आले, पण ‘ही’ कामगिरी फक्त भारतालाच जमली, अर्शदीप-सिराजच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे केलं साध्य