भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आता आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस आहे. लवकरच सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामात तो अखेरच्या वेळी खेळताना दिसू शकतो. याबाबत त्याने स्वतः संकेत दिले आहेत. त्याचवेळी यावर्षी केवळ धोनीसाठी लोक आयपीएलला गर्दी करतील, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने केले आहे.
धोनी हा सध्या केवळ आयपीएल खेळताना दिसतो. वयाच्या चाळीशीत असताना तो केवळ आयपीएलमध्ये सहभागी होत असतो. तीन वर्षांपूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यामुळे यंदा त्याला अखेरच्या वेळी खेळताना पाहण्यासाठी लोक गर्दी करतील असे हेडन म्हणाला,
“धोनी निर्विवादपणे सर्वात मोठा स्टार आहे. यावर्षी आयपीएलनंतर तो निवृत्त होईल. सुदैवाने यावर्षी संपूर्ण आयपीएल देशभरात होणार आहे. तीन वर्षांपासून आपण या गोष्टीला मुकलो होतो. त्यामुळे यंदा धोनी ज्या ज्या शहरात जाईल तिथे त्याला अखेरच्या वेळी खेळताना पाहण्यासाठी मोठी गर्दी होईल.”
धोनीने 2020 ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तेव्हापासून तो केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच त्याने वक्तव्य केले होते की, आपला अखेरचा सामना मला चेन्नईमध्ये खेळायला आवडेल. धोनीने 12 हंगामात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी चार वेळा चेन्नईला विजेतेपद मिळवण्यात यश आलेय. कोरोना महामारीमुळे आयपीएलचे मागील तीन हंगाम मर्यादित शहरांमध्ये खेळले गेले होते. मात्र, यावेळी सर्व संघांना प्रत्येकी साथ होम आणि सात अवे सामने खेळायला मिळणार आहेत. त्यामुळे धोनी इतर संघांच्या मैदानांवर देखील जाऊन खेळताना दिसेल.
(Mathew Hayden Said Crowd Came For CSK Captain Dhoni In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संतापजनक! धावांचा डोंगर उभा राहताच कर्णधार रोहित हादरला, पाणी घेऊन आलेल्या सहकाऱ्यावर मोक्कार चिडला
टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढत ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनने बनवला मोठा रेकॉर्ड, स्वप्नही झाले पूर्ण