न्यूझीलंड व पाकिस्तान संघामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अपेक्षेप्रमाणेच न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला. न्यूझीलंडच्या विजयात वेगवान गोलंदाज नील वॅगनरने महत्त्वाची भूमिका बजावली. पायाला दुखापत होऊनही वॅगनरने अनेक वेळ गोलंदाजी केली.
शतकी खेळी करणाऱ्या फवाद आलम आणि अष्टपैलू फहीम अशरफला अंतिम क्षणी बाद करून वॅगनरने सामन्याचे चित्र बदलले होते. यादरम्यानच बातमी समोर येत आहे की वॅगनर दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला असून त्याच्या जागी अनुभवी गोलंदाज मॅट हेन्रीला संघात स्थान मिळाले आहे.
वॅगनर पहिल्या सामन्यात फलंदाजी करत असताना दुखापतग्रस्त झाला होता. गोलंदाजाने टाकलेला चेंडू थेट त्याच्या पायावर लागल्याने तो मोठ्या वेदनेने संपूर्ण सामन्यात खेळला. सामन्यादरम्यान अनेक वेळा वॅगनरने वेदनानाश करणारी इंजेक्शन्स घेतली, व संपूर्ण सामन्यात उत्तम गोलंदाजी केली. वॅगनरच्या या खेळ भावनेचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे.
मॅट हेन्रीच्या समावेशाबद्दल न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड म्हणाले, “मॅट हेन्री मागील बऱ्याच कालावधीपासून उत्तम गोलंदाजी करत आहे. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात त्याने 53 धावा देत 6 बळी मिळवले होते. अजून दुसऱ्या सामन्यासाठी काही दिवस बाकी असून, खेळपट्टी बघितल्यानंतरच आम्ही संघाची घोषणा करू.”
नील वॅगनर संदर्भात प्रतिक्रिया देतांना गॅरी स्टीड म्हणाले, “वॅगनरने फार उत्तम गोलंदाजी केली. माझ्यामते त्याने जे काही केले ते कोणताच खेळाडू करू शकत नाही. आता त्याला 6 आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला मिळालेला आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
कमिन्सच्या गोलंदाजीपुढे पुजाराचे लोटांगण चिंताजनक, दोन सामन्यात तब्बल तीनवेळा झालाय बाद
पुरुषांचा दौरा होऊ शकतो, मग महिलांचा का नाही? क्रिकेट ऑस्ट्रेलियालावर भडकले आकाश चोप्रा
भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा अव्वल क्रमांक पटकाविण्याची संधी, करावी लागेल अशी कामगिरी