Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“मी विनामोबदला ऑस्ट्रेलिया संघाला मदत करण्यासाठी तयार”, समालोचन करत असलेल्या दिग्गजाची ऑफर

February 21, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Australia Team

Photo Courtesy: bcci.tv


भारतीय संघाने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 गडी राखून मोठा विजय मिळवला. हा विजय मिळवताच भारतीय संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर पोहोचला. तसेच, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी देखील भारताने आपल्याकडेच राखली. ऑस्ट्रेलियन संघापुढे आता व्हाईट वॉश‌ टाळण्याचे मोठे आव्हान असेल. त्याचवेळी आता ऑस्ट्रेलियन संघाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने ऑस्ट्रेलियन संघाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

नागपूर येथील पहिल्या कसोटीत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पहिल्या दोन दिवसात ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट खेळ दाखवत सामन्यावर पकड देखील मिळवली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने आपले नऊ बळी गमावले. त्यानंतर भारतासमोर असलेले छोटे लक्ष भारताने चार गडी गमावत पूर्ण करत मालिकेत आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियन फलंदाज मोठ्या प्रमाणावर संघर्ष करत असताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर राहिलेल्या हेडनने संघाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. एका मुलाखतीत बोलताना हेडन म्हणाला,

“मी ज्या दिवशी मला ऑस्ट्रेलिया संघाच्या मदतीसाठी बोलावण्यात येईल त्यावेळी मी लगेच तिथे असेल.‌ या कामासाठी मी एक पैसाही घेणार नाही. मात्र, सध्याच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रशासकांनी माजी खेळाडूंना देखील संघाशी जोडणे आवश्यक आहे. सर्व माजी खेळाडू आपल्या संघाला मदत करण्यासाठी तत्पर असतात.”

हेडन हा भारत दौऱ्यावर नेहमीच यशस्वी ठरला होता. त्याने प्रत्येक दौऱ्यावर भारतीय संघाविरुद्ध वर्चस्व गाजवले होते. सध्याच्या संघातील कोणताही फलंदाज त्याच्यासारखा स्वीप खेळताना दिसला नाही. मागील दोन टी20 विश्वचषकात त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती.

(Matthew Hayden Wants Become Australia Cricket Team Batting Consultant In India Tour)

‌महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिल नव्हेतर ‘हा’ फलंदाज वाटतो स्मिथला ‘फ्युचर सुपरस्टार’, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये
BREAKING: क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर मॉडेल सपना गिलकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल,‌‌ सेल्फी प्रकरण चिघळले 


Next Post
Australia-Cricket-Team

गंभीरने दाखवला ऑस्ट्रेलियाला पुनरागमनाचा मार्ग! म्हणाला, "एवढे करा जिंकाल"

Photo Courtesy: Twitter/ICC

टी20 फलंदाजी क्रमवारीत भारतीय पोरींचा बोलबाला! तब्बल 5 जणी टॉप-20 मध्ये

Photo Courtesy: Twitter

थँक्यू सानिया! भारतीय 'टेनिस क्वीन'च्या 20 वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची सांगता

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143