इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात देखील पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान संघाने दिलेल्या ३३२ धावांचे आव्हान इंग्लंड संघाने ४८ षटकातच यशस्वीरित्या पूर्ण करत मालिका ३-० ने आपल्या नावावर केली. या सामन्यादरम्यान इंग्लंड संघाचा फिरकीपटू मॅथ्यू पार्किन्सन याने एक सुरेख चेंडू टाकत दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्नची आठवण करून दिली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अनेक दिग्गज फलंदाजांना अडकवले होते. त्याचीच आठवण करुन देणारा चेंडू पार्किन्सन याने पाकिस्तान संघाचा फलंदाज इमाम उल हक विरुद्ध टाकत त्याला त्रिफळाचीत केले. मुख्य बाब म्हणजे इमामला कळाले सुद्धा नाही की चेंडू कधी जाऊन यष्टीला धडकला.(Matthew Parkinson spin reminds shane Warne imam ul haq clean bowled)
या सामन्यातील पहिल्या डावात २६ वे षटक टाकण्यासाठी मॅथ्यू पार्किन्सन गोलंदाजीला आला होता. त्यावेळी इमाम-उल-हक ५६ धावांवर फलंदाजी करत होता. या षटकातील ५ वा चेंडू मॅथ्यु पार्किन्सनने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. तेव्हा इमाम-उल-हक हा चेंडू सोडण्याच्या विचारात होता. परंतु, त्याचवेळी शेवटच्या क्षणी तो चेंडू जबरदस्त फिरला आणि इमाम त्रिफळाचीत झाला. चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून थेट मधल्या यष्टीला जाऊन धडकला.
हा चेंडू पाहून क्रिकेट चाहत्यांना २००५ ॲशेस मालिकेची आठवण झाली असेल. त्यावेळी, शेन वॉर्नने देखील इंग्लंडचा फलंदाज अँड्र्यू स्ट्रॉसला अशाच प्रकारे बाद केले होते.
You just can't play that 🤯
Absolute magic 😍
Scorecard/clips: https://t.co/wtCtb2kz8n
🏴 #ENGvPAK 🇵🇰 @mattyparky96 pic.twitter.com/gYySs5Msju
— England Cricket (@englandcricket) July 13, 2021
इमाम-उल-हकने केला विक्रम
या सामन्यात इमाम-उल-हकने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात त्याने दोन हजार वनडे धावा पूर्ण करण्याचा टप्पा गाठला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करण्याच्या बाबतीत तो ५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ४६ व्या वनडे सामन्यात दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिकन संघाचा माजी फलंदाज हाशिम आमला आहे. आमलाने हा पराक्रम ४० व्या वनडे डावात केला होता. इमाम उल हकने या बाबतीत वेस्ट इंडिजच्या सर विवियन रिचर्ड्स आणि भारतीय फलंदाज शिखर धवनला मागे टाकले आहे. या दोघांनी ४८ व्या वनडे डावात दोन हजार धावांचा पल्ला गाठला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐतिहासिक कामगिरी! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आयर्लंडने रचला इतिहास, वनडे मालिकेतही घेतली आघाडी