इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. २ जूनला सुरू झालेल्या या सामन्याचा पहिला दिवस संपला असता दोन्ही संघाच्या मिळून १७ विकेट्स पडल्या आहेत. या सामन्यासह इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम या जोडीचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. त्याचबरोबर जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या इंग्लंडच्या महान गोलंदाजांनी पुनरागमन केले आहे.
याच सामन्यातून २३ वर्षीय वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स याचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही झाले आहे. त्याने पदापर्णाच्या सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली आहे. मॅथ्यू पॉट्सने त्याच्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनची (Kane Williamson) विकेट घेत जबरदस्त कसोटी पदार्पण केले आहे. तो कसोटीमध्ये इंग्लडकडून खेळणारा ७०४वा खेळाडू ठरला आहे.
What a moment for Matthew Potts 🤩
He receives his maiden Test cap from former England quick Steve Harmison 🧢#ENGvNZ | #WTC23 pic.twitter.com/vKfPwiCv89
— ICC (@ICC) June 2, 2022
इंग्लंड आणि डरहमचे महान खेळाडू स्टीव्ह हॅरमिसन यांच्याकडून पॉट्सला कसोटी कॅप मिळाली. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ९.२ षटके टाकत ४ विकेट्स घेतल्या आहेत. यातील ४ षटके त्याने निर्धाव टाकली आहेत.
डरहमच्या या वेगवान गोलंदाजाने इंग्लंडच्या १९ वर्षाखालील संघातील सामने खेळले आहेत. त्याने २०१९च्या टी२० ब्लास्ट हंगामात १७ विकेट्स घेतल्याने तो चर्चेत आला होता. तसेच २०२२च्या सहा प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ३५ विकेट्स घेतल्या.
A Test debut to remember for Matthew Potts 🌟#WTC23 | #ENGvNZ | https://t.co/0momrRykzB pic.twitter.com/dscVXQtwND
— ICC (@ICC) June 3, 2022
कसोटी पदार्पणातच विलियमसनची विकेट घेणारा पॉट्स हा दुसराच गोलंदाज आहे. बांगलादेशच्या तस्किन अहमदने २०१७ मध्ये कसोटी पदार्पण करताना विलियमसनची विकेट घेतली होती.
कसोटी चॅम्पियन असलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटचा पहिलाच सामना खेळताना २३ वर्षीय पॉट्सने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याने विलियमसन (२ धावा) बरोबर डैरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेल या महत्वाच्या फलंदाजांना बाद केले आहे.
The stuff dreams are made of! 👏
Match Centre: https://t.co/kwXrUr13uJ
🏴 #ENGvNZ 🇳🇿 | @MattyJPotts pic.twitter.com/5AQnLog2sR
— England Cricket (@englandcricket) June 2, 2022
अँडरसन-पॉट्स या वेगवान गोलंदाज जोडीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टीकूच दिले नाही. त्यांनी प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या आहेत. तर न्यूझीलंडचे सहा फलंदाज एकेरी धावा करत तंबूत परतले. कॉलिन डी ग्रँडहोमने नाबाद ४२ धावा केल्याने न्यूझीलंडचा पहिला डाव १३२ धावसंख्येवर थांबला.
इंग्लंडच्या पहिल्या डावाला चांगली सुरूवात झाली, पण ट्रेंट बोल्ट आणि कायल जेमिसनच्या माऱ्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. त्यांना टीम साऊदी, कॉलिन डी ग्रँडहोम यांनी योग्य साथ दिली. इंग्लंडने पहिल्या डावात ७ विकेट्स गमावत ११७ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कौतुक करावे तितके कमीच! बेन स्टोक्स ‘थोर्प’ नावाची जर्सी घालून उतरला मैदानात, कारण अभिमानास्पद
जेम्स अंडरसनच्या चतुर गोलंदाजीने ‘दादा’ला केलं इंप्रेस, व्हिडिओ शेअर करत उधळली स्तुतीसुमने
जेव्हा स्टुअर्ट बिन्नीने वनडेत केवळ ४ धावा देत घेतल्या होत्या ६ विकेट्स, पाहा व्हिडिओ