भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्याची सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ दुखापतग्रस्त डेविड वॉर्नरच्या पर्यायाच्या शोधात होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीत अनुभवी शॉन मार्शला सलामीला पाठवण्याचा तोडगा सुचवला होता. परंतु ऑस्ट्रेलिया संघाने डावखुरा फलंदाज मॅथ्यू वेडला प्राधान्य दिले. मात्र, पहिल्या डावात वेड सपशेल फ्लॉप ठरला. यानंतर बॉर्डर यांनी भाष्य केले आहे.
कसोटी सामन्यात परिस्थिती वेगळी होती- बॉर्डर
याविषयी बोलताना ऍलन बॉर्डर म्हणाले, ” मॅथ्यू वेडला सलामीला पाठवणे ऑस्ट्रेलिया संघाला महागात पडले. हा एक प्रकारचा जुगार होता. कारण ऑस्ट्रेलिया संघाने कसोटी सामन्यासाठी वेडला त्याच्या नियमित स्थानापासून दूर केले. वेडने यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून टी२० क्रिकेट सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे. पण भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातील परिस्थिती खूप वेगळी होती. कारण त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीही सलामीवीराची भूमिका निभावली नव्हती.”
मॅथ्यू वेडची पहिल्या डावातील आकडेवारी
ऍडलेड ओव्हल स्टोडियमवर चालू असलेल्या दिवसरात्र कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २४४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ १९१ धावांवरच सर्वबाद झाला. खराब फॉर्ममध्ये असलेल्या मॅथ्यू वेडने जो बर्न्ससह या डावाची सुरुवात केली. मात्र, ५१ चेंडूत केवळ एक चौकार लगावत ८ धावांवर मॅथ्यू वेड पायचीत झाला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारताविरुद्ध ‘या’ खेळाडूला उतरवा सलामीला”; ऍलन बॉर्डर यांनी सुचवला तोडगा
“दुसऱ्या कसोटी सामन्यात नका देऊ संधी”, पृथ्वी शॉच्या फ्लॉप खेळीला पाहून वैतागले समालोचक
विराटच्या पहिल्या बाळाचा पाळणा हालणार ऑस्ट्रेलियात?, माजी ऑसी क्रिकेटरने दिले आमंत्रण