टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एक षटक राखून पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली असून पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीने पाकिस्तानकडून सामना हिरावून घेतला.
मॅथ्यू वेडने १७ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या, तर स्टॉयनिसने ३१ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. उपांत्य सामन्यात हसन अलीने मॅथ्यू वेडचा झेल सोडला आणि सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. मात्र, वेडने या घटनेला कलाटणी देणारा क्षण म्हणण्यास नकार दिला आहे. त्याने हा झेल घेतला असता, तरी आपला संघ जिंकला असता, असे सांगितले.
शाहिन आफ्रिदीने गोलंदाजी केलेल्या १९ व्या षटकात मॅथ्यू वेडचा झेल हसन अलीकडून सुटला. त्यानंतर या षटकात वेडने अखेरच्या तीन चेंडूंवर सलग षटकार ठोकले आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
वेड १७ चेंडूत ४१ धावा करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक ठरला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत वेड म्हणाला, ‘हे सांगणे कठीण होईल, पण झेल सोडणे हा टर्निंग पॉइंट होता, असे मला वाटत नाही. मला वाटतं त्यावेळी आम्हाला १२ किंवा १४ धावांची गरज होती. (वास्तविक २० धावांची गरज होती) त्यावेळी सामना आमच्या बाजूने वळायला लागला होता असे मला वाटते.’
तो म्हणाला, ‘जर मी बाद झालो असतो, तर काय झाले असते हे निश्चितपणे सांगता येणार नाही, पण मला खात्री आहे की पॅट कमिन्सने खेळपट्टीवर येऊन मार्कस स्टॉयनिसच्या साथीने संघाला विजयाकडे नेले असते. झेल सोडल्यामुळे आम्ही सामना जिंकला असे मी म्हणणार नाही.’
दुसरीकडे, पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने सामन्यानंतर या पराभवासाठी अलीच्या चुकीला जबाबदार धरले. बाबर म्हणाला, ‘तो झेल सुटला हा सामन्याचा ‘टर्निंग पॉइंट’ होता. आम्ही तो झेल घेतला असता तर परिस्थिती वेगळी असती.’
वेडने सांगितले की, सामन्यात त्याने स्वतःच्या अनुभवावर दबाव हाताळला. वेड म्हणाला की, ‘अनुभव नक्कीच मदत करतो, या प्रकारच्या सामन्यांमध्ये अनुभव महत्त्वाचा असतो. आम्ही सामन्याच्या सुरुवातीला काही विकेट लवकर गमावल्या होत्या, तरी ड्रेसिंग रूममध्ये कोणतीही भीती नव्हती. आमचे सर्व खेळाडू अनुभवी आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या –
पुढीलवर्षी विश्वचषकापूर्वी भारतीय संघ करणार न्यूझीलंड दौरा, असे आहे वेळापत्रक
मॅक्सवेल ज्या पाकिस्तानी गोलंदाजाचा चाहता, त्याच्यासोबत सेमीफायननंतर बदलली जर्सी, पाहा फोटो