---Advertisement---

“आणखी एक विश्वचषक जिंकून निवृत्त होणार”; ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितला ‘रिटायरमेंट प्लॅन’

On: शुक्रवार, नोव्हेंबर 19, 2021 12:06 AM
aus-t20
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे जेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी२० चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला होता. ऑस्ट्रेलिया संघाला अंतिम सामन्यात पोहचवण्यात यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याचेही अमूल्य योगदान राहिले होते. मॅथ्यू वेड याने क्रिकेटमधील आपल्या भविष्याबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-श२० विश्वचषकानंतर निवृत्तीचा विचार करू शकतो, असे वेडने म्हटले आहे.

एका मुलाखतीदरम्यान मॅथ्यू वेडने त्याच्या निवृत्तीच्या योजनांचा खुलासा केला. वेड म्हणाला की, घरच्या मैदानावर विजेतेपदाचे राखणे ही त्याची ऑस्ट्रेलिया संघासाठी शेवटची जबाबदारी असेल. तो म्हणाला, “हीच माझी पुढची प्रेरणा आणि आशा आहे की, आम्ही टी२० विश्वचषक जिंकू. या विजेतेपदाचे रक्षण करणे आणि मग मी निवृत्त होऊ शकेन. जर असे झाले तर मी नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. आता हेच माझे ध्येय असेल.’

वेडने हे देखील उघड केले की तो न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात त्यास दुखापत झाली होती तरी तो मैदानात उतरला होता. त्याला अंतिम सामन्यापूर्वी सराव सत्रात ही दुखापत झाली होती. याबाबत तो म्हणाला,
“जर मला बॅट स्विंग करता येत नसती तर मी खेळलो नसतो. आधी फलंदाजी आली असती तर मला यष्टीरक्षन करणे अवघड गेले असते, जर संघाचे नुकसान झाले असते तर मी खेळालो नसतो.”

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वेडने जबरदस्त फलंदाजी केली आणि शेवटच्या काही चेंडूंमध्ये सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वळवला. वेडने अंतिम सामन्यात १७ चेंडूत नाबाद ४१ धावांची आक्रमक खेळी खेळली, यादरम्यान त्याने शाहीन आफ्रिदीच्या एका षटकात तीन षटकार ठोकले होते. ऍशेससाठी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात वेडची निवड करण्यात आलेली नाही आणि आता त्याचे एकमेव लक्ष्य ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकाचे विजेतेपद राखणे हे आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने दुबईत झालेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवत पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक जिंकला. पुढील टी२० विश्वचषक ऑक्‍टोबर २०२२ पासून ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---