---Advertisement---

अगग! २२ वर्षीय गोलंदाजाच्या रणनितीपुढे अनुभवी विलियम्सनने टेकले गुडघे, स्टोक्सलाही हसू अनावर

Kane-Williamson-Wicket
---Advertisement---

सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघात ३ सामन्यांची कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत इंग्लंडच्या संघाकडून दोन युवा गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पहिला म्हणजे मॅट पार्किसन आणि दुसरा जलद गती गोलंदाज मॅटी पॉट्स. मॅटी पॉट्स या युवा गोलंदाजाने पहिल्याच कसोटी सामन्यांत इंग्लंडकडून खेळत असताना न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याला एकदा नव्हे तर दोन्ही डावांत अगदी कमी धावांवर बाद केले आहे.

मॅटी पॉट्सने (Matty Potts) आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवून क्रिकेटजगताला आपल्या नावाची ओळख करून दिली आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात पॉट्सने ९.२ षटके टाकताना १३ धावांत ४ बळी घेतले, ज्यामध्ये न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) बाद करण्यात तो यशस्वी ठरला. विल्यमसनला न्यूझीलंड संघाच्या पहिल्या डावात केवळ २ धावा करता आल्या.

यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाला कर्णधार विल्यमसनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण या २३ वर्षीय गोलंदाजाने विल्यमसनला बाद करून चमत्कार घडवला. विल्यमसनला दुसऱ्या डावात केवळ १५ धावा करता आल्या.

पॉट्सने पहिल्या डावात विल्यमसनला यष्टिरक्षकाकडून झेल देऊन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता, तर दुसऱ्या डावात त्याने आपल्या शानदार चेंडूवर कर्णधाराला चकवले आणि बॅयरस्टोच्या हातात झेल देत विल्यमसन बाद झाला. इंग्लंड क्रिकेटच्या ट्विटर अकाऊंटवरून विल्यसनच्या बळीचा व्हिडिओ शेअर करत ‘पदार्पण असावे तर असे…’ असे कॅपशन देत पॉट्सला कौतुकाची थाप देण्यात आली आहे. सध्या इंग्लंट क्रिकेटने केलेले हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.

https://twitter.com/englandcricket/status/1532688784763912192?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1532688784763912192%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fwatch-video-the-moment-when-matty-potts-snares-kane-williamson-for-second-time-in-lord-s-test-ben-stokes-laughs-hindi-3037215

दरम्यान, या कसोटीच्या पहिल्या डावांत न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा मात्र १३२ धावांत त्यांचा डाव आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला देखील विशेष कामगिरी करता आली नाही. इंग्लंडला देखील पहिल्या डावांत केवळ १४१ धावा करता आल्या. त्यानंतर इंग्लंडला ९ धावांची बढत मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावांत फलंदाजी करत असताना सध्या न्यूझीलंडने ४ बळी गमावत २३६ धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या न्यूझीलंडकडे दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस २२७ धावांची आघाडी आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेल्या खेळाडूने दाखवला मनाचा मोठेपणा, चाहत्याला ग्रेटभेट देत जिंकले हृदय

‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकणारा ‘तो’ जितक्या वेगाने प्रसिद्ध झाला तितक्याच वेगाने क्रिकेटमधून गायब झाला

‘पुढच्या १० महिन्यांनंतर आरसीबीच जिंकणार आयपीएल ट्रॉफी’, बेंगलोरच्या वेगवान गोलंदाजाची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---