नुकताच आयपीएलचा मिनी लिलाव नुकताच कोचिन येथे पार पडला. या लिलावात बऱ्याच खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला, तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा आली. मागच्या हंगामात पंजाब किंग्ज संघाकडून रिलिज करण्यात आलेला खेळाडू मयंक अगरवाल यंदा मिनी लिलावासाठी उपलब्ध होता. लिलावात त्याची बेस प्राईझ 1 कोटी इतकी होती. मयंकसाठी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघात चढाओढ बघायला मिळाली. शेवटी सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली आणि 8 कोटी 25 लाख रुपायांमध्ये मयंक अग्रवाल याला आपल्या संघात सामील केले.
मयंक अगरवाल (Mayank Agarwal) या लिलावातील सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला त्याच्या बेस प्राईझच्या आठपट जास्त रक्कम मिळाली आहे. मागच्या हंगामात त्याला पंजाब किंग्ज संघाने 14 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मात्र, यंदाच्या हंगामासाठी त्याला संघाकडून रिलिज करण्यात आले.
आयपीएलचा यंदाचा सोळावा हंगााम असणार आहे. लिलावात उतरलेल्या धाकड खेळाडूंना आपल्या संघात सामील करुन घेण्यासाठी फ्रेचांयझीमध्ये चढाओढ बघायला मिळाली. आता पर्यंत आयपीएलचे 15 हंगाम खेळवले गेले आहेत. मुंबई इंंडिन्स संघाने सर्वाधिक 5 वेळा आयपीएलचे जेेतेपद पटकावले आहे. त्याच्या खालोखाल चेन्नई सुपर किंग्ज संघाने 4 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली.
ही बातमी अपडेत होत आहे..
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तोटा झाला रे! आयपीएल 2023च्या लिलावात रहाणेला 50 लाखांचा फटका, चेन्नईने घेतलं फक्त ‘एवढ्या’ लाखात
मोठी बातमी! दीड कोटींचा नवखा इंग्लिशमन 13.25 कोटीत हैदराबादच्या चमूत; वाचा कोण आहे तो