---Advertisement---

एका धावेने शतक हुकले, पण मयंकच्या नावे झाला ‘हा’ कीर्तिमान

On: सोमवार, मे 3, 2021 6:43 PM
Mayank Agarawal
---Advertisement---

रविवारी (२ मे ) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला होता. डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यापूर्वी,पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुल हा अपेंडिक्सचा त्रास होत असल्यामुळे सामन्यातून बाहेर झाला होता. त्याच्याऐवजी मयंक अगरवालने कर्णधाराची भूमिका पार पाडली होती. मयंक या सामन्यात १ धावेसाठी शतक करण्यापासून हुकला असला तरीही त्याने एक नवीन किर्तीमान आपल्या नावावर केला आहे.

मयंक अगरवालने आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब किंग्ज संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात २६० धावा केल्या आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील त्याने अवघ्या ५८ चेंडूत नाबाद ९९ धावांची खेळी केली होती. यात त्याने ८ चौकार आणि ४ षटकार लगावले होते. त्याला शतक पूर्ण करण्यात १ धाव कमी पडली. परंतु तो आयपीएल स्पर्धेत ९९ धावांवर नाबाद राहिलेला तिसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत ख्रिस गेल आणि सुरेश रैना यांसारख्या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे.

आयपीएल स्पर्धेत ९९ धावांवर नाबाद राहिलेले फलंदाज-
१) सुरेश रैना : विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (२०१३)
२)ख्रिस गेल :विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (२०१९)
३)मयंक अगरवाल : विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (२०२१)*

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना, ६ बाद १६६ धावा केल्या होत्या.यामध्ये कर्णधार मयंक अगरवालने सर्वाधिक ९९ धावांची खेळी केली होती. तर डेविड मलानने २६ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली होती. तर पृथ्वी शॉने ३९ धावांचे योगदान दिले होते. दिल्ली कॅपिटल्स संघाने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला होता. तसेच या विजयासह दिल्ली कॅपिटल्स संघाने गुणतालिकेत १२ गुणांसह पहिले स्थान गाठले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“मी खरचं चकित झालोय, त्याने कायमच…,” तीनवेळच्या ऑरेंज कॅप विजेता वॉर्नरला संघाबाहेर केल्याने दिग्गज संतापला

आवड, स्टाईल की अजून काही; एकवेळ डोक्यावर भरगच्च केस असलेला गब्बर आता का ठेवतो टक्कल? वाचा

भर मैदानात शिखर धवनने दिली हार्ट अटॅक आल्याची रिऍक्शन, असं नेमकं काय घडलं? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---