---Advertisement---

दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी ‘या’ खेळाडूची झाली भारताच्या वनडे संघात निवड

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिका नुकतीच रविवारी(2 फेब्रुवारी) संपली. आता बुधवारपासून(5 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 21 फेब्रुवारीपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होईल.

मात्र भारताला वनडे मालिका सुरु होण्याआधी मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा वनडे आणि कसोटी मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

रविवारी न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी20 सामन्यात फलंदाजी करताना रोहितच्या पोटरीचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे तो 60 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर त्याने या सामन्यात क्षेत्ररक्षणही केले नाही. आता तो उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यातूनच बाहेर पडला आहे.

त्यामुळे आता त्याच्याऐवजी मयंक अगरवालची बदली खेळाडू म्हणून भारतीय वनडे संघात निवड करण्यात आली आहे.

याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली की ‘रविवारी न्यूझीलंड विरुद्धच्या 5 व्या टी20 सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या डाव्या पोटरीचा स्नायू दुखावला गेला. त्यानंतर रोहितचे सोमवारी(3 फेब्रुवारी) हेमिल्टनमध्ये एमआरआय स्कॅन करण्यात आले.’

‘तो या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या दुखापतीच्या पुढील उपचारासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल होईल. त्याचा बदली खेळाडू म्हणून मयंक अगरवालचा भारताच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.’

तसेच भारताने आज(4 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही 16 जणांचा भारतीय संघ घोषित केला आहे. या संघात पृथ्वी शॉचे पुनरागमन झाले आहे. तसेच युवा फलंदाज शुबमन गिलला देखील भारताच्या कसोटी संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता रोहितच्या अनुपस्थितीत भारताकडे कसोटीसाठी मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल हे सलामीवीर फलंदाज म्हणून पर्याय आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी , शार्दुल ठाकूर, केदार जाधव.

न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा (तात्पूरता समावेश).

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---