---Advertisement---

विजय शंकरच्या ऐवजी या खेळाडूची झाली टीम इंडियात निवड; बीसीसीआयने केली घोषणा

On: सोमवार, जुलै 1, 2019 6:01 PM
---Advertisement---

भारताचा उद्या(2 जूलै) 2019 विश्वचषकातील 8 वा सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे. पण या सामन्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी युवा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालची भारतीय संघात निवड केली असल्याचे आज बीसीसीआयने जाहिर केले आहे.

शंकरला 19 जूनला साऊथँम्पटन येथे नेटमध्ये सराव करत असताना डाव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याला बुमराहचा चेंडू लागला होता. पण या दुखापतीनंतरही शंकर अफगाणिस्तान आणि विंडीज विरुद्ध खेळला.

पण विंडीज विरुद्धच्या सामन्यानंतर त्याची ही दुखापत आणखी वाढली. तसेच सीटी स्कॅनमध्ये दिसून आले की त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला नॉन-डिस्पेस फ्रॅक्चर आहे. ही दुखापत बरी होण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्याला या दुखापतीतून बाहेर पडावे लागले आहे.

त्यामुळे आता भारतीय संघ व्यवस्थापनाने शंकरचा बदली खेळाडू म्हणून मयंक अगरवालला उर्वरित विश्वचषकासाठी बोलावून घेतले आहे. अगरवालने अजून भारताच्या वरिष्ठ संघाकडून एकही वनडे सामना खेळलेला नाही.

पण त्याने मागील वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यातून भारताकडून पदार्पण केले होते. आता त्याला वनडेमध्येही विश्वचषकातून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

मयंकची अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. तसेच तो भारत अ संघाकडूनही खेळला आहे. त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 75 सामन्यात 48.71 च्या सरासरीने 3605 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 12 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत.

त्याचबरोबर त्याने भारताकडून खेळलेल्या दोन कसोटी सामन्यात 65 च्या सरासरीने 195 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतके केली आहेत.

भारताला याआधीही शिखर धवन बाहेर पडल्याने मोठा धक्का बसला होता. शिखरच्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने त्याला या विश्वचषकातून बाहेर जावे लागले होते. त्याच्या ऐवजी रिषभ पंतला संधी देण्यात आली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

युजवेंद्र चहलने मोडला १६ वर्षांपूर्वीचा नकोसा असा विक्रम…

धोनी-केदारच्या धीम्या खेळीचा विराट-रोहितने केला बचाव

भारताला मोठा धक्का; शिखर पाठोपाठ विजय शंकरही पडला विश्वचषकातून बाहेर!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment